अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखं स्वराज्यात येणार; पाहा खास फोटो

स्वराज्याचा शत्रू अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची "ती वाघनखं" अखेर 19 जुलैला स्वराज्यभूमीत येणार आहेत.

लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात येणार असून सातारा येथे संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे राज्यातील शेकडो शिवप्रेमी संस्था लाखो शिवप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.

तर छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे, बळ आहे शक्ती आहे; याच शक्तीने बलाढ्य योद्धा असलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. हा इतिहास रोमांच उभा करणार आहे आणि महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या शौर्यवान व बलवान करणारा आहे.

म्हणूनच ही वाघनखे स्वराज्य भूमीत आणण्याचा संकल्प मी केला होता आणि तो पूर्ण होतोय याचे मला समाधान आहे. अशी भावना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
