मोठी बातमी! जॉर्जियाच्या माउंटन रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरूममध्ये मिळाले मृतदेह

  • Written By: Published:
मोठी बातमी! जॉर्जियाच्या माउंटन रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरूममध्ये मिळाले मृतदेह

11 Indians die in Georgia mountain resort : जॉर्जियाच्या ( Georgia) गुडौरी माउंटन रिसॉर्टमध्ये 12 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये 11 भारतीय आणि एक स्थानिक नागरिक आहे. जॉर्जियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणानंतर एका निवेदन जारी केलंय. त्यात म्हटले आहे की मृतांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा हिंसाचाराच्या खुणा आढळल्या नाहीत.

मंत्रिमंडळातून पत्ता कट; माजी मंत्री तानाजी सावंतांनी डीपी बदलला, नव्या पिक्चरवर कोण? 

कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायुची गळती झाल्यामुळं या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, ही घटना दुर्दैवी असून मृत नागरिकांचे मृतदेह भारतात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना जॉर्जियातील गुडौरी जवळील एका माउंटन रिसॉर्टमध्ये घडली. निवेदनात म्हटले आहे की, हे सर्व मृत व्यक्ती एकाच भारतीय रेस्टॉरंटचे कर्मचारी होते, ते सर्वजण रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावर बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळले.

मंत्रिमंडळातून पत्ता कट; माजी मंत्री तानाजी सावंतांनी डीपी बदलला, नव्या पिक्चरवर कोण? 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या सर्वांचा मृत्यू कार्बन मोनोऑक्साइडमुळे झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही बाब समोर आली. रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूमजवळ इलेक्ट्रिक जनरेटर ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झालं. लाईट गेल्यानंतर या जनरेटरचा वापर करण्यात आला होता आणि कार्बन मोनॉऑक्साइड संपूर्ण खोलीत पसरला. त्यामुळं सर्वांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी जॉर्जिया पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक रिसॉर्टमध्ये पोहोचले असून मृत्यूचे नेमके कारण तपासले जात आहे.

दरम्यान, तिबिलिसीमधील भारतीय दूतावासाने 11 भारतीय नागरिकांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत असून लवकरच मृतदेह भारतात पाठवले जातील, असे दूतावासाने सांगितले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या