पळण्याच्या तयारीत असतानाच जमावानं गाठलं अन्.. मारहाणीत सिनेनिर्माता बाप-लेकाचा अंत

पळण्याच्या तयारीत असतानाच जमावानं गाठलं अन्.. मारहाणीत सिनेनिर्माता बाप-लेकाचा अंत

Film Producer Died in Bangladesh Violence : हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या बांग्लादेशातून (Bangladesh Violence) आणखी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. देशातील अराजकात घरांची लुटालूट, आगी लावणे, घरात घुसून मारहाण या घटना अगदी सामान्य झाल्या आहेत. उन्मादी आणि हिंसक जमावाच्या नजरेत जो येईल त्याला आपला शत्रू समजून मारण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार बांग्लादेशातील प्रसिद्ध चित्रपट निर्माता सलीम खान आणि त्यांचा मुलगा शांतो खान यांच्याबाबतीत घडला. जमावाच्या मारहाणीत या दोघांचा बळी गेला.

मीडियातील रिपोर्ट्सनुसार सोमवारी सलीम खान आणि शांतो खान घरातून पळून जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात फरक्काबाद बाजारात संतप्त जमाव त्यांच्या समोर आला. या जमावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. तेथून कसेबसे निसटल्यानंतर पुढे बगरा बाजारात पुन्हा जमाव चालून आला. या ठिकाणीत जमावाने दोघांना घेरलं अन् बेदम मारहाण केली. या मारहाणीत बाप आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Bangladesh violence: बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हिंदुंच्या जीवावर; मंदिरांची तोडफोड, जाळपोळ

सलीम खान भारतातील बंगाली फिल्म इंडस्ट्री, टॉलीवूडशीही संबंधित होते. त्यांनी टॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला घेऊन कमांडो नावाचा चित्रपट तयार केला होता. परंतु, काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार टॉलीवूडमध्ये सलीम खान यांचे दहा चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यांत होते. या चित्रपटांत टॉलीवूडमधील मोठे अभिनेते काम करत होते. टॉलीवूडशी संबंधित एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूस अरिंदम यांनी सोमवारीच सलीम खान यांच्याबरोबर चर्चा केली होती. सलीम खान खान यांनी बांग्लादेशी ‘Tungiparar Miya Bhai’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

सलीम खान यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप होते. चांदपूर नेव्ही हद्दीजवळ पद्मा मेघन नदीतून होत असलेल्या बेकायदेशीर उत्खननात सलीन खानही सहभागी होते अस आरोप त्यांच्यावर आहे. या व्यापारातून त्यांनी भरपूर पैसा कमावल्याच्या चर्चा बांग्लादेशात सुरू असतात. या प्रकरणात त्यांना कारावासाची शिक्षाही झाली होती. त्यांच्या विरुद्ध अँटी करप्शन कमिशनचा खटलाही सुरू होता. चांदपूर पोलिसांनी सांगितले की आम्हाला दोन व्यक्तींच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. पण याबाबत कुणीही आम्हाला काही कळवलेलं नाही. सध्याची परिस्थिती आणि आमची सुरक्षितता या गोष्टींचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही.

Bangladesh : धक्कादायक! हॉटेलच्या आगीत 8 होरपळले; हिंसक जमावाच्या मदतीने 500 कैदी पळाले

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube