‘बीबीसी’चा ‘तो’ माहितीपट युट्युब आणि ट्विटरवर ब्लॉक

‘बीबीसी’चा ‘तो’ माहितीपट युट्युब आणि ट्विटरवर ब्लॉक

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे. दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीबीसीचा संबंधित माहितीपट यूट्यूब (YouTube)आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे बीबीसी डॉक्युमेंटरी शेअर करणारे ट्विट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ट्विटद्वारे बीबीसी डॉक्युमेंटरीची यूट्यूब लिंक शेअर करण्यात आली आहे ती देखील ब्लॉक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत सूचना जारी केल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंटरीची चौकशी केली
परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयासह अनेक मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिका-यांनी डॉक्युमेंटरी तपासून पाहिली आणि त्यात प्रशासनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याचे आढळून आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विविध भारतीय समुदाय. पेरण्याचा प्रयत्न सांगितला आहे.

माहितीपट मध्ये नेमकं आहे तरी काय?
बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ (India: The Modi Question) नावाचा माहितीपट बनवला. या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्ये गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगली या घटनांशी संबंधित राजकीय नेते, पत्रकार आणि पीडित लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube