कोरोना महामारी तज्ज्ञाच्या दाव्याने जगभरात खळबळ

  • Written By: Last Updated:
कोरोना महामारी तज्ज्ञाच्या दाव्याने जगभरात खळबळ

दोन वर्ष कोरोना संकटाने त्रस्त झालेल्या जगावर पुन्हा एकदा कोरोना संकटाची टांगती तलवार आहे. चीन, अमेरिका, जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जग कोरोनाच्या विळख्यात अडकणार असा अंदाज बांधला जातोय.

चीनमध्ये 7 दिवसांतच कोरोनाचे 35 लाख नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 9928 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चीनच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडल्याचं दिसून येतंय. रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे.

चीनमधील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर केंद्राने सर्व राज्यांना कोरोना नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या जिनोम सिक्वेन्सिंगमुळे कोरोना व्हेरियंटचा मागोवा घेणे सोपे होणार आहे.

अशातच एका महामारी तज्ज्ञाच्या दाव्याने जगभरात घबराट पसरली आहे. त्यांचा अंदाज आहे की 3 महिन्यांमध्ये चीनच्या 60 टक्क्यांहून अधिक आणि जगातील10 टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात लाखो लोकांचा मृत्यू होण्याची अंदाज महामारी तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube