बंगळुरु विमानतळावर चार प्रवासी कोरोनाबाधित, चारही जणांचं विलगीकरण

बंगळुरु विमानतळावर चार प्रवासी कोरोनाबाधित, चारही जणांचं विलगीकरण

बंगळुरु : चीननंतर आता भारतातदेखील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. बंगळुरु येथील विमानतळावर चार प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आलीय. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नसून प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार बंगळुरु येथील विमानतळावर चार जण कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांचं विलगीकरण करण्यात आलंय.

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. देशातील सर्वच सरकारी दवाखान्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलची तयारी सुर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलीय.

जगभरात चीनसह इतर देशांतही कोरोना विषाणुने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून भारतात अद्याप कोरोना विषाणुचे अधिक रुग्ण आढळले नसून खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानूसार राज्य सरकारने नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असं आवाहन केलंय.

तसेच नागरिकांना कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण महत्वाचं असल्याचं म्हंटलयं. सर्व नागरिकांना आपलं लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

कर्नाटकातील बेंगळुरू येथील कॅम्पगौडा विमानतळावर चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चारही बाधितांचं विलगीकरण करण्यात आले आहे. कोरोनाबाधित प्रवासी आढळून आल्याने विमानतळावर मास्क बंधनकारक करण्यात आलंय. मास्क घातल्याशिवाय कोणालाही विमानतळावर प्रवेश दिला जाणार नसल्याचं विमानतळ संचालकांकडून सांगण्यात आलंय.

तसेच कोरोना संकटासाठी आपण किती तयार आहोत हे पाहण्यासाठी आज मॉक ड्रिल केलं जात असून आपण संपूर्ण सतर्कता बाळगली पाहिजे असल्याचं मत ओडिशाचे आरोग्य संचालक बीके महापात्रा यांनी व्यक्त केलंय.

दरम्यान, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत कोरोना नियम लागू करण्यात आले असून धार्मिक स्थळांवर कोरोना नियम लागू करण्यात आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube