चूक झाली तर थेट तोंडावर थुंकतात; आखाती देशात अडकलेल्या पंजाबी मुलीनं सांगितली भयानक आपबिती

चूक झाली तर थेट तोंडावर थुंकतात; आखाती देशात अडकलेल्या पंजाबी मुलीनं सांगितली भयानक आपबिती

Building Fire In Kuwait : कुवेतमधील मंगाफ शहरातील एका निवासी इमारतीला आग लागल्याने ५० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या 50 लोकांपैकी 45 भारतीय लोकं होते. सहा मजली इमारतीत झालेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण कुवेतमध्ये परदेशी कामगारांच्या उपचाराबाबत नकारात्मकता दाखवण्यात आली. (Building Fire) यातील अनेक लोकांच मृतदेह भारतात आणण्यात आले आहेत. दरम्यान, या देशात आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जातात. त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. (Kuwait) येथे काम करणाऱ्या एका महिलेने इथली विदार परिस्थिती सांगितली आहे.

मोदी- मेलोनींचा फोटो पुन्हा चर्चेत; 8 फोटो ज्यांनी इंटरनेटचं ट्रॅफिक वाढवलं

लाखो भारतीय कामगार दक्षिण आफ्रिकेत स्थायिक आहेत. यामध्ये केवळ कुवेत किंवा कतारच नाही तर ओमानचाही यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या साईटवरील माहितीनुसार या आखाती देशात 6.5 लाखांहून अधिक भारतीय राहतात. त्यापैकी कमी व्यावसायिक आणि जास्त कामगार आहेत. या तेल देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ते 13 टक्क्यांहून अधिक आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, सुमारे दीड वर्षांपासून ओमानमध्ये राहणाऱ्या जसमीत या महिलेने येथील काही गोष्टी सांगितल्या आहेत.

ती म्हणाली भारतात माझं कुटुंब आहे. मात्र, प्रत्येकजण आजारी आहे. पतीला गंभीर मधुमेह आहे. सासऱ्यांची तब्येत खराब आहे ते झोपून असतात. मुलगी अजून लहान आहे. अशा परिस्थितीमध्ये घरात कुणी कमावणारं नाही. दरम्यान, काम शोध असताना एजंट भेटला ज्याने मला मला लाखो रुपये पगाराची ऑफर दिली. दुबईत चांगली नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, मला ओमानला पाठवलं. आता येथे अनेक दिवसांपासून एका फ्लॅटमध्ये राहते. येथेच नाही तर या काळात सुमारे 14 जणांच्या घरी काम करतीय. कोणत्याही रजेशिवाय मी काम करत आहे. काही चूक झाली तर आरबी बाबा थेट तोंडावर थुंकतात. ती थुंकी पुसून पुन्हा कामाला लागणे अशी दुर्देवी कथा जसमीत सांगते.

एसआयटी चौकशी रद्द केली फक्त शेंगा हाणल्या; जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर संशय

फोनवर बोलायला मिळते का? या प्रश्नावर ती म्हणाली होय. पण इथे एक मुलगी आहे. तीला हिंदी चांगलं येतं. तिच्यासमोर बोलताही येत नाही. त्यामुळे मला फोन करायला किंवा उचलायला वेळ मिळत नाही. पूर्वी ज्या घरात फोन ठेवला होता तिथे फोन ठेवण्यास मनाई केली होती. त्यानंतर अनेक महिने घरच्यांशी बोलता आलं नाही असंही ती सांगते. तसंच, काय काम करते असं विचारलं असा सर्व काम करावं लागत असं सागितलं. स्वच्छता, स्वयंपाक, भाज्या धुणे. जेवणाचे टेबल साफ करणे. भांडी धुणे ही सगळी काम करावी लागतात. तसंच, घरात 14 लोक आहेत. एखाद्या व्यक्तीने 14 वेळा कॉल केला तर 14 वेळा जाऊन ते काम करावं लागतं असंही तीने सांगितलं आहे. त्याचबरोबर रोज रोज 24 तास काम करावं लागत असल्याचंही तीने सांगितलं आहे.

या राज्यातील लोकांचा मृत्यू
केरळ – 23
तामिळनाडू – 7
आंध्र प्रदेश – 3
यूपी -3
ओडिशा – 2
बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या