कतारमध्ये ‘रास लाफान इंडस्ट्रियल सिटी’च्या गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट, 12 भारतीयांसह 13 जणांचा मृत्यू
gas plant explosion in Qatar भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 12 जण भारतीय नागरिक असल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली.
Massive explosion at gas plant in Qatar’s ‘Ras Laffan Industrial City’ 13 people including 12 Indians killed : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील गॅस प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 12 जण भारतीय नागरिक असल्याची माहिती भारतीय दूतावासाने सोमवारी (22 जून 2026) दिली. दोहा येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात कतारच्या अधिकाऱ्यांनी या मृत्यूंची पुष्टी केल्याचे म्हटले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची तूफान बॅटिंग! पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात मान्सूनचं आगमन
दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात जखमी झालेल्या सर्वांवर योग्य उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी भारतीय दूतावास कतार प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. तसेच मृत भारतीय नागरिकांचे पार्थिव शक्य तितक्या लवकर भारतात पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकतं? मराठी ZEE5 घेऊन येतयं नवी सीरिज ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’
कतारचे ऊर्जा मंत्री साद बिन शेरिदा अल-काबी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या दुर्घटनेत भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कतारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, रविवारी सायंकाळी बरजान स्थानिक गॅस पुरवठा प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्याने स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. या दुर्घटनेत किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून 66 जण जखमी झाले आहेत.
Qatari authorities have confirmed that 12 Indian nationals have unfortunately passed away in the Ras Laffan incident yesterday night. We extend our deepest condolences to the bereaved families and prayers for the departed souls.
Qatari authorities have also confirmed that all…
— India in Qatar (@IndEmbDoha) June 22, 2026
लखनौ कोचिंग क्लास आग प्रकरणात तिघांना अटक; इमारत मालक अन् क्लास संचालकाचा समावेश
घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचाव मोहीम पूर्ण झाल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. या स्फोटामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सहयोगी सदस्य; शिंदेंशी चर्चा केल्यानंतर काय म्हणाले गोकुळ गीते?
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( S. Jaishankar) यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील संदेशात मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत भारतीय दूतावास प्रभावित कुटुंबांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. तसेच या दुर्घटनेतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना केल्याचेही त्यांनी नमूद केले.