Italy येथील स्थलांतरित जहाजाच्या दुर्घटनेत 30 हून अधिक मृत्यू तर 40 जणांचे वाचले प्राण

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (92)

इटली : इटलीमध्ये कॅलाब्रियाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. (Italy Migrant Shipwreck) याविषयी इटालियन (Italy) वृत्तसंस्थांनी सांगितले की, दक्षिण इटलीत समुद्रकिनाऱ्यावर ३० जणांचे मृतदेह सापडले आहेत, (Migrant Shipwreck) बोटीतील सर्वजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना किनाऱ्याजवळ मृतदेह तरंगताना आढळले आहे.

RAI राज्य रेडिओने दिलेल्या माहितीनुसार की, इटलीच्या दक्षिण किनारपट्टीवर स्थलांतरित बोट उलटल्यावर इटालियन तटरक्षकांनी सुमारे ३० मृतदेह पाहिले आहेत. कॅलाब्रियामधील क्रोटोन या किनारी शहराजवळ आयोनियन समुद्रात बोट बुडाली, तेव्हा ही बोट १०० हून जास्त स्थलांतरित लोकांना घेऊन जात होती, असे अज्ञात बंदर अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

अंजीर खाल्ल्यास शरीराला होतात हे फायदे

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४० जण जिवंत सापडले आहेत. बचाव अधिकारी लुका कॅरी यांनी सांगितले की, वाचवण्यात आलेल्यांपैकी काहीजण जखमी झाले आहेत. बचावकार्य अजून देखील सुरू आहे. न्यूज एजन्सी एजीआयने ३० मृतदेह बाहेर काढले आणि मृतांमध्ये काही महिन्यांचे एक बाळ असल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली आहे. तटरक्षक दल, सीमा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बोटीच्या बचाव कार्यात गुंतल्याचे रेडिओ अहवालात सांगितले आहे.

नेमकं स्थलांतरित कोठून आले याविषयी अहवालात तपशील दिला नाही. एका अधिका-यांनी सांगितले की, बोट कोठे निघून गेली हे स्पष्ट झाले नाही, परंतु कॅलाब्रियामध्ये येणार्‍या बहुतेक स्थलांतरित नौका तुर्की किंवा इजिप्शियन किनारपट्टीवरून निघून जात आहेत.

 

Tags

follow us