Nepal Gen Z Protest : मोठी बातमी, नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार, 12 जिल्ह्यात कर्फ्यू

Nepal Gen Z Protest : भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, नेपाळमध्ये

  • Written By: Published:
Nepal Gen Z Protest

Nepal Gen Z Protest : भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, नेपाळमध्ये जेन-झी आणि माजी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला ज्यामूळे तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हिंसक संघर्षादरम्यान सहा पोलीस अधिकारी जखमी झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या बारा जिल्ह्यात मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे जिथे जेन झी चळवळीचे (Nepal Gen Z Protest) सदस्य माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) च्या समर्थकांशी वाद घातल होते. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, सुव्यवस्था पुनर्संचयित करण्याची गरज असल्याचे सांगून, गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) कर्फ्यू लागू राहील.

बुधवारी, बारा जिल्ह्यातील सिमरा भागात जेन झी निदर्शक आणि सीपीएन-यूएमएल कार्यकर्त्यांनी रॅली काढली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. ज्यामुळे अधिकाऱ्यांना कर्फ्यू लागू करावा लागला.

कोणीही गंभीर जखमी झालेले नाही ; नेपाळ पोलीस

नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते अबी नारायण काफले यांनी एएफपीला सांगितले की, परिस्थिती सामान्य आहे. कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. दरम्यान, नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांनी शांततेचे आवाहन केले आणि सर्व पक्षांना 5 मार्च 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अनावश्यक राजकीय चिथावणी टाळा आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवा असे आवाहन केले.

बुधवार उशिरा जारी केलेल्या निवेदनात कार्की म्हणाल्या, मी गृह मंत्रालय आणि सुरक्षा संस्थांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत संयम आणि तयारीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करायची आहे आणि निवडणुकीसाठी निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरण निर्माण करायचे आहे.

कार्की यांनी बुधवारी 110 हून अधिक पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकही घेतली. बैठकीत ते म्हणाल्या, आम्हाला हा देश नवीन पिढीच्या हातात हवा आहे आणि दूरदृष्टी असलेल्या लोकांनी त्याचे व्यवस्थापन करावे अशी आमची इच्छा आहे.

नेपाळममध्ये जेन झी निषेध

8 आणि 9 सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये किमान 76 लोकांचा मृत्यू झाला. हे निदर्शने सरकारने सोशल मीडियावर तात्पुरत्या बंदी घातल्याने झाली. सप्टेंबरमधील निदर्शने मागील सरकारच्या सोशल मीडिया बंदीमुळे झाली होती, परंतु आर्थिक मंदी आणि व्यापक भ्रष्टाचाराच्या वर्षानुवर्षे चाललेल्या निषेधामुळे संताप अधिकच तीव्र झाला आहे.

निदर्शनांच्या दरम्यान, चार वेळा पंतप्रधान राहिलेले 73 वर्षीय ओली यांना पदावरून हटवण्यापूर्वी संसद, न्यायालये आणि सरकारी कार्यालये जाळण्यात आली.

यूएमएल नेपाळमध्ये प्रमुख राजकीय पक्ष

यूएमएल, किंवा नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (युनिफाइड मार्क्सवादी-लेनिनवादी), नेपाळच्या प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक आहे. हा पक्ष डाव्या विचारसरणीवर आधारित आहे आणि नेपाळच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे त्याचे सर्वोच्च नेते आहेत.

आशुतोष काळे करणार कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित

follow us