चीनच्या मैत्रीचे साईड इफेक्ट; विरोधानंतरही नेपाळने माघारी बोलावले 11 राजदूत

चीनच्या मैत्रीचे साईड इफेक्ट; विरोधानंतरही नेपाळने माघारी बोलावले 11 राजदूत

Nepal Government : नेपाळ सरकारने भारत अमेरिकेसह अकरा देशांतून त्यांच्या राजदूताना पुन्हा माघारी बोलावले आहे. यामध्ये नेपाळी काँग्रेस कोट्यातून नियुक्त राजदूतांचाही समावेश आहे. पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी नेपाळी काँग्रेस बरोबरील आघाडी तोडून चीन समर्थक माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या बरोबर हात मिळवणी केली. या नंतर तीन महिन्यांनी सरकारने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. काठमांडू पोस्ट मधील वृत्तानुसार सरकारच्या या निर्णयाला उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री नारायण काजी श्रेष्ठ यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत सरकारने हा निर्णय अमलात आणला.

नेपाळ सरकारने भारतातील राजदूत शंकर शर्मा यांच्यासह अन्य देशांतील राजदूतांना माघारी बोलावले आहे. भारतात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला नेपाळचे पंतप्रधान उपस्थित राहतील अशी शक्यता आहे मात्र त्याआधीच हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय अराजनायिक संदेश देणारा असल्याचे विदेश मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारने असा निर्णय घेऊ नये असे विदेश मंत्री श्रेष्ठ यांनी सांगितले होते. या प्रस्तावाचा त्यांनी विरोध सुद्धा केला होता. परंतु पंतप्रधान दहल आणि सीपीएन – युएमएल चे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांनी एकतर्फी निर्णय घेत राजदूतांना माघारी बोलावले.

Nepal : नेपाळमध्ये ‘चीन’ची एन्ट्री! जुनी युती तुटली; सरकारमध्ये PM प्रचंड अन् चीन समर्थकांची आघाडी?

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) आणि (Pushpa Kamal Dahal) माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा (Sher Bahadur Deuba) यांच्यातील 15 महिने जुनी युती काही महिन्यांपूर्वी तुटली. यानंतर आता पीएम दहल चीनी समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांच्याबरोबर आघाडी केली. अशा प्रकारे नेपाळच्या राजकारणात पुन्हा चीनने एन्ट्री (China) घेतली. चीनची एन्ट्री भारतासाठी अडचणीची ठरेल हे तेव्हाच जाणकारांनी सांगितलं होतं. त्यांचा हा अंदाज आता खरा होताना दिसत आहे.

दरम्यान, चीन नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, सरकारसोबत भारत समर्थक शेर बहादूर देऊबा होते. त्यामुळे चीनच्या अडचणी वाढल्या होत्या. सरकारमधून देऊबा गटाला बाहेर काढणे आणि केपी शर्मा ओली यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी चीनकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांत अखेर चीन यशस्वी झाला. आता या राजकारणाचा भारतावर (Nepal India Relation) परिणाम होण्यास सुरुवातही झाली आहे. भारत आणि नेपाळमधील संबंध पुन्हा बिघडणार का? याच प्रश्नाचं उत्तर काय मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

आजोबा नेपाळचे PM, मुलगा केंद्रात मंत्री; मध्य प्रदेशच्या माधवीराजे सिंधिया कालवश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube