भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या पाकने चीनकडे पसरले हात! 10 अब्ज युआन डॉलरच्या कर्जाची केली मागणी

Pahalgam terrorist attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) तणाव वाढलाय. भारताने उचललेल्या कठोर पावलांचा परिणाम पाकिस्तानमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. भारताने घेतलेल्या निर्णयामुळं पाकिस्तान अडचणीत आला. पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या मित्र राष्ट्रांकडे मदतीचा हात पुढे करायला सुरुवात केल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने चीनकडून १० अब्ज युआन कर्ज मागितले. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब (Muhammad Aurangzeb) यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.
Pahalgam Terror Attack ‘…तर पाकिस्तानसोबत युद्ध करा’, रामदास आठवलेंची मोठी मागणी
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने चीनकडून १० अब्ज युआन कर्ज मागितले. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी या मुलाखतीदरम्यान याबद्दल माहिती दिली.औरंगजेब म्हणाले की, पाकिस्तानने चीनला त्यांची विद्यमान स्वॅप लाइन १० अब्ज युआन (१.४ अब्ज डॉलर्स) पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. तसेच आम्हाला आशा आहे की देश वर्षाच्या अखेरीस पांडा बाँड लाँच करेल, असंही ते म्हणाले.
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकीदरम्यान रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत औरंगजेब बोलत होते. पाकिस्तानकडे आधीच ३० अब्ज युआनची स्वॅप लाइन असल्याची माहिती औरंगेजब यांनी यावेळी दिली. दरम्यान, पाकिस्तानने चीनकडे मागितलेले १० अब्ज युआनची किंमत पाकिस्तानी चलनात अंदाजे ३९,३३३ कोटी रुपये इतकी आहे.
मी कट्टर हिंदुत्ववादी, गोळ्या खाईल, पण कुराण…; नवनीत राणांकडून हिंदुत्ववादाचा एल्गार
ऑक्टोबर २०२४ मध्येही मागितली होती चीनकडे मदत…
यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये, पाकिस्तानने चीनकडे १० अब्ज युआन (१.४ अब्ज डॉलर्स) अतिरिक्त कर्जाची विनंती केली होती. रोख रकमेची कमतरता असलेल्या या देशाने आधीच विद्यमान ३० अब्ज युआन (४.३ अब्ज डॉलर्स) चा चीनी व्यापार सुविधेचा वापर केला आहे.
स्वॅप लाइन म्हणजे काय?
वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये चलनांची देवाणघेवाण करण्यासाठी केलेल्या कराराला स्वॅप लाइन म्हणतात. एकमेकांना परकीय चलन प्रदान करण्यासाठी स्वॅप लाइनची मदत होते.
भारताला अणुहल्ल्याची धमकी
पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची उघड धमकी दिली आहे. जर भारताने पाणीपुरवठा थांबवला तर त्यांनी पूर्ण युद्धासाठी तयार राहावं. आपल्याकडे असलेली क्षेपणास्त्रे आणि लष्करी उपकरणे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत. घौरी, शाहीन आणि गझनवी सारखी क्षेपणास्त्रे तसेच सुमारे १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवली, असं अब्बासी म्हणाले.