Rahul Gandhi : राहुल गांधींना लग्नासाठी अशी मुलगी हवी…पाहा नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : भारतभर सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. यातच राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या चर्चेत आहे. राहुल गांधी अद्यापही अविवाहीत आहे. नुकताच राहुल यांना लग्नाबाबत विचारले असता ते म्हणाले माझा लग्नाला विरोध नाही, मात्र चांगली मुलगी मिळाली की लग्न करणार आहे. अस राहुल गांधी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात ‘भारत जोडो’ यात्रा सुरु असुन ही यात्रा सध्या जम्मू-काश्मीर राज्यात आहे. ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रा शेवटच्या टप्प्यात प्रवास करत आहे. राहुल गांधींनी कामिया जानी (Kamiya Jani) या फूड युट्यूबरशी संवाद साधला आहे. काँग्रेसने आपल्या समाज माध्यमांवर याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. राहुल गांधींनी यावेळी कामिया जानी यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
राहुल गांधी लग्न कधी करणार?
माझा लग्नास विरोध नाही. चांगली मुलगी मिळाली की लग्न करणार आहे. पण, एकच अट आहे, की मुलगी हुशार पाहिजे.
आवडती डिश कोणती?
घरी असेल तर फणस आणि वाटाण्याची भाजी खाणं टाळतो. मांसाहारीमध्ये चिकन टिक्का, सीख कबाब, ऑम्लेट खाणे आवडतं. दररोज सकाळी कॉफी पितो. बाहेर खाण्यास जायचं असल्यास जुन्या दिल्लीत जातो.
जर पंतप्रधान झालात तर काय कराल?
पंतप्रधान झालो तर शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक परिवर्तन घडवणार. उद्योगांना मदत करणार. तसेच शेतकरी, मजूर, बेरोजगार तरुण अशा वाईट काळातून जात आहेत, त्यांना मी सुरक्षा देणार
राहुल गांधीनी सांगितला नोकरीचा किस्सा
लंडनमध्ये मॉनिटर कंपनीत राहुल गांधी यांनी सल्लागार म्हणून नोकरी केली. मला पहिला पगार ३ हजार पौंड होता. हे पैसे खोलीच्या भाड्यासाठी जात होते.