जगातला लहानसा कोपरा भूकंपाचा अड्डा; जाणून घ्या, रशियाच्या ‘त्या’ बेटावर होतात भूकंप?

जगातला लहानसा कोपरा भूकंपाचा अड्डा; जाणून घ्या, रशियाच्या ‘त्या’ बेटावर होतात भूकंप?

Russia Earthquake : रशियाच्या पू्र्वेला असणाऱ्या कामचटका या बेटावर (Russia Earthquake) आज अतिशय मोठा भूकंप झाला. US जिओलॉजिकल सर्वेनुसार या भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर संपूर्ण पॅसिफिक समुद्राच्या (Pacific Ocean) परिसरात त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला. भूकंपाचा केंद्रबिंदू 19.3 किलोमीटर खोल होता. या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटले होते. या भूकंपात येथील एका शाळेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

भूकंपानंतर रशिया, जपान, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, चीन, इंडोनेशिया, तैवान, फिलीपीन्स, पेरू, मेक्सिको आणि इक्वाडोर यांसारख्या देशांत त्सुनामीचा इशारा देण्यात आला. जपानच्या होक्काइडो बेटाच्या नेमुरो तटावर जवळपास 30 सेंटीमीटर उंच लाटा उसळत होत्या. यानंतर जपान सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. येथील वीस लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. या व्यतिरिक्त फुकुशिमा आण्विक रिएक्टरही रिकामे करण्यात आले.

रशिया हादरला! 8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका वाढला

कमचटका नक्की कुठे?

कमचटका बेट भूगर्भीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. हे क्षेत्र पॅसिफिक प्लेट आणि नॉर्थ अमेरिकन प्लेटच्या सबडक्शन झोनवर आहे. या ठिकाणी भूगर्भाती एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली घसरत जाते. या कारणामुळे येथे सातत्याने भूकंप होत असतात तसेच ज्वालामुखी बाहेर येण्याचे प्रमाणही जास्त आहे. कमचटका रिंग ऑफ फायरचा एक घटक आहे. हा परिसर प्रशांत महासागराच्या चारही बाजूंनी पसरलेला आहे. जगातील 75 टक्क्यांपेक्षा जास्त ज्वालामुखी आणि 90 टक्के भूकंप या भागात होत असतात.

कमचटका भागात याआधीही शक्तीशाली भूकंप झालेले आहेत. 4 नोव्हेंबर 1952 रोजी येथे 9.0 तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपाच्या वेळी जवळपास 30 फूट उंच लाटा उसळत होत्या. यानंतर जुलै 2025 मध्ये याच भागात पाच मोठे झटके जाणवले होते. यातील एक भूकंप 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपानंतर सरकारी यंत्रणा या परिसरावर लक्ष ठेऊन आहेत. किनारी भागापासून लांब राहण्याच्या सूचना लोकांना दिल्या आहेत. या भूकंपामुळे सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही तरीदेखील धोका अजून टळलेला नाही.

मोठी बातमी! अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रता 4.2

follow us
  • fb
  • instagram
  • youtube