दक्षिण कोरियात हायहोल्टेज ड्रामा! राष्ट्रपती यून सूक योल यांना अटक; कारवाईने खळबळ

दक्षिण कोरियात हायहोल्टेज ड्रामा! राष्ट्रपती यून सूक योल यांना अटक; कारवाईने खळबळ

South Korea President Arrested : दक्षिण कोरियात हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. महाभियोग आणण्यात आलेले़ राष्ट्रपती यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी पहाटेच अधिकारी योल यांच्या घरी दाखल झाले. स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार अधिकारी आणि पोलीस पथक राष्ट्रपतींच्या घरी दाखल झाले.याआधी 3 जानेवारीलाही योल यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्यावेळी पोलीस पथक आणि राष्ट्रपती सुरक्षा सेवेचे कर्मचारी यांच्यात जोरदार वाद झाले. त्यामुळे पोलिसांना योल यांना अटक करता आली नाही. आज मात्र मोठा फौजफाटा आणि चोख बंदोबस्त ठेवत योल यांना अटक करण्यात आली.

फक्त 14 दिवसांत 2 राष्ट्रपती बदलले, ‘या’ देशात मोठं राजकीय संकट; वाचा नेमकं काय घडलं?

बीबीसीच्या रिपोर्टनुसार बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अधिकारी राष्ट्रपतींच्या घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. यून यांचे समर्थक आणि विरोधकही येथे गोळा होऊ लागले. एक हजार पोलिसांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यात ते यशस्वी ठरले. राष्ट्रपती सुरक्षा सेवा विभागाचे कार्यवाहक प्रमुख किम सुंग हून यांना अटक केल्याची चर्चा होती. परंतु, पोलिसांना यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. दक्षिण कोरियाची न्यूज एजन्सी योनहापच्या रिपोर्टनुसार, तपासी अधिकाऱ्यांनी शिडीचा वापर करून राष्ट्रपतींच्या घरात प्रवेश केला.

सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि यून यांच्या वकिलांनी प्रवेशद्वार रोखून धरले होते. यून मागील काही दिवसांपासून घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे ते घरात असतील असे समजून पोलिसांनी येथे कडक बंदोबस्त तैनात केला होता. यानंतर त्यांना मोठ्या प्रयत्नांनंतर अटक करण्यात आली. या घटनेनंतर दक्षिण कोरियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देशभरात याच घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

तीव्र विरोध अन् संताप..फक्त सहाच तासांत दक्षिण कोरियाने मागे घेतला मार्शल लॉ

मार्शल लॉ निर्णयानंतर गदारोळ

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांनी काही दिवसांपूर्वी देशभरात मार्शल लॉ (South Korea Martial Law) लागू केला होता. देशाच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाविरोधात देशातील जनतेने तीव्र विरोध केला. विरोधी पक्ष तर सरकारवर तुटूनच पडले होते. त्यामुळे फक्त सहा तासांतच राष्ट्राध्यक्षांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. परंतु, या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी संसदेत योल यांच्याविरुद्ध महाभियोग आणला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube