अख्ख्या जगाला प्रश्न पडला! चीन पाकिस्तानची गाढवं का खरेदी करतो? एका क्लिकवर खरं कारण जाणून घ्या…

2024 मधील करारानुसार पाकिस्तान चीनला 2 लाख गाढवे विकणार आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

_China Imports Donkeys From Pakistan

Why China Imports Donkeys From Pakistan : चीन आता पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गाढवं खरेदी करत आहे. अख्ख्या जगाला प्रश्न पडला आहे की, चीनला पाकिस्तानची गाढवं इतकी का आवडतात? 2024 मधील करारानुसार पाकिस्तान चीनला 2 लाख गाढवे विकणार आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तसेच, आगामी काळात चीन पाकिस्तानकडून गाढवांची आयात आणखी वाढवण्याची योजना करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

पण अनेकांना प्रश्न पडतो, चीन (China) पाकिस्तानकडून (Pakistan) गाढवे (Donkeys) खरेदी करून त्यांचा उपयोग नेमका कसा करतो? या लेखात आपण या व्यापाराची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

गाढवांचा पुरवठा आणि कत्तलखाने

सध्या पाकिस्तानमध्ये अंदाजे 5.2 दशलक्ष गाढवे आहेत. पाकिस्तान हा गाढवे जास्त (China Imports Donkeys From Pakistan) प्रमाणात असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे चीनसाठी मोठ्या प्रमाणात निर्यात करणे शक्य आहे. पाकिस्तान चीनला निर्यात करण्यासाठी कराचीजवळ (Shocking News) नवीन कत्तलखाना उघडण्याच्या तयारीत आहे. तसेच, ग्वादरमध्ये नवीन कत्तलखाने बांधले जात आहेत, ज्यामुळे निर्यातीची क्षमता वाढेल आणि चीनच्या मागणीला तोंड देता येईल.

चीन गाढवे का खरेदी करतो?

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये एजियाओ (Ejiao) नावाचे औषध तयार करण्यासाठी गाढवांच्या कातडीपासून मिळणाऱ्या जिलेटिनचा उपयोग केला जातो. या औषधाची मागणी चीनसह इतर देशांमध्येही जास्त आहे.

एजियाओ तयार करताना गाढवाच्या कातडीपासून मिळणाऱ्या जिलेटिनमध्ये औषधी वनस्पती आणि इतर घटक मिसळले जातात. या औषधाचे उपयोग खालील प्रकारे होतात:

1. रक्ताभिसरण सुधारणे
2. रक्तस्त्राव थांबवणे
3. त्वचेचा तजेलदारपणा वाढवणे
4. शांत झोप येणे

चीनला दरवर्षी किती गाढवे लागतात?

एजियाओच्या मोठ्या मागणीमुळे चीनला पाकिस्तानकडून गाढवे खरेदी करणे गरजेचे आहे. चीनमध्ये गाढवांचा जन्मदर कमी असल्याने स्थानिक पुरवठा टिकवणे कठीण झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, एजियाओ औषधासाठी दरवर्षी अंदाजे 60 लाख गाढवांच्या कातडीची आवश्यकता असते. याशिवाय, गाढवांचे मांसही चीनमध्ये लोकप्रिय आहे.

हेबेई प्रांतात गाढवाच्या मांसापासून तयार केलेला पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. बाओडिंग आणि हेजियान शहरांमध्ये गाढवाचे मांस बर्गर म्हणून खाल्ले जाते.

पाकिस्तान-चीन गाढवांचा व्यापार

चीन पाकिस्तानकडून गाढवे खरेदी करत असताना, पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढत आहे. यासोबतच चीन पाकिस्तानला आर्थिक साहाय्यही पुरवत आहे. 2022 मध्ये चीनने पाकिस्तानला 26.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले असल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तानला गाढवे निर्यात करून फायदा होतो. चीनला औषध निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल मिळतो. ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर व्यावसायिक संधी आहे.

follow us