‘भारत जोडो यात्रे’त अखिलेश यादव, मायावती सहभाग घेणार?

‘भारत जोडो यात्रे’त अखिलेश यादव, मायावती सहभाग घेणार?

लखनऊ : तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून सुरु असलेल्या कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला महाराष्ट्रासह देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. सध्या भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत असून दिल्लीतून भारत जोडो यात्रा आता उत्तर प्रदेशात प्रवेश करणार आहे.

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात भाजपची चांगली मोट बांधून ठेवल्याची परिस्थिती आहे. ही बांधलेली मोट फोडण्यासाठी कॉंग्रसने उत्तर प्रदेशातील समविचारी पक्षांना भारत जोडो यात्रेचं निमंत्रण दिलंय.

कॉंग्रेसकडून भारत जोडो यात्रेसाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह बहुजन समाज पक्षाच्या बहन मायावती यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. मायावती आणि अखिलेश यादव यांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबाही दिला.

मात्र, आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आता अखिलेश यादव आणि मायावती यांना आमंत्रण मिळालं असलं तरी हे दोन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत.

काँग्रेसची ही पदयात्रा लवकरच उत्तर प्रदेशमध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना राहुल गांधी यांनी आमंत्रित केलं आहे. या पदयात्रेत अनेक लोकं सहभागी होत असून राजकारणी नेत्यांसह, कलाकार, यात्रेत सहभाग घेत आहेत.

यात्रेत राहुल गांधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेत असून भाजपकडून तोडण्यात आलेल्या भारताला आम्ही जोडण्याच काम करत असल्याचं राहुल गांधींकडून सांगण्यात येतंय.

दरम्यान, महाराष्ट्रात मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादानंतर कॉंग्रेसची ही पदयात्रा सध्या राजधानी दिल्लीत असून पुढे ही यात्रा लवकरच उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर कॉंग्रेसला भारत जोडो यात्रेचा कितपत फायदा होणार? हे आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून लावण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube