धक्कादायक! ११ हजार लोकांच्या घरांवर संकट; ‘या’ कारणामुळे अख्खा देशच पाण्यात बुडणार?
Tuvalu Country in Danger : जगातील लहान देशांत गणल्या जाणाऱ्या तुवालू या (Tuvalu) देशात सध्या मोठं संकट आलं आहे. कदाचित हा देश जगाच्या नकाशावरून नाहीसा होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक तापमान बदलामुळे (Global Climate change) समुद्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे तुवालू देशाचं अस्तित्वच संकटात सापडल आहे. तुवालू पॅसिफिक महासागरात स्थित एक लहानसा बेट देश आहे. या देशात फक्त ११ हजारांच्या आसपास लोक राहतात. हा देश लहान रींगच्या आकाराच्या नऊ बेटांमध्ये वसला आहे.
तूवालू बेटाची समुद्रापासून सरासरी उंची २ मीटर (६.५६ फूट) इतकी आहे. या कारणामुळे जलवायु परिवर्तनाचा परिणाम या देशावर तत्काळ होतो. जागतिक जलवायु परिवर्तनामुळे समुद्राची पातळी वेगाने वाढत चालली आहे. मागील तीन दशकांच्या काळात समुद्राच्या पाणी पातळीत १५ सेंटिमीटर (जवळपास ६ इंच) इतकी वाढ झाली आहे. जागतिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण दीड पट जास्त आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०५० पर्यंत तुवालूतील फुनाफुटी बेटाचा अर्धा हिस्सा जलमग्न होण्याचा धोका आहे. या भागात तूवालूतील ६० टक्के लोकसंख्या राहते.
भारतीय पासपोर्ट आणखी स्ट्राँग! जगातील ‘इतक्या’ देशांत व्हिजा फ्री एन्ट्री; सिंगापूर पुन्हा अव्वल
मुलांना जन्म देण्यासही वाटतेय भीती
वैज्ञानिकांनी सांगितले आहे की सध्याच्या काळात मुलांचा जन्म झाला तर ज्यावेळी ही मुले मोठी झालेली असतील त्यावेळी बहुतांश देश पाण्याखाली गेलेला असेल. अशा परिस्थितीत तुवालूतील नागरिक मुलांना जन्म देण्यास लवकर तयार होत नाहीत. भाजीपाला उगवण्यासाठी येथील लोक आता रेन वॉटर टँक आणि उंचावर तयार करण्यात आलेल्या बागांवर अवलंबून आहेत. खाऱ्या पाण्याच्या पुरामुळे ग्राउंड वॉटरला नष्ट केले आहे. यामुळे अन्न धान्य उत्पादनात अडचणी येत आहेत.
दरवर्षी २८० लोकांना ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याची संधी
तुवालू देशाने सन २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर (Australia) एक जलवायु आणि सुरक्षा कराराची घोषणा केली होती. यानुसार २०२४ पासून दरवर्षी तुवालूमधील २८० नागरिकांना ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याची संधी मिळणार आहे. जलवायु परिवर्तनामुळे तुवालूचे अस्तित्व संकटात आहे. जगभरातील लहान बेट देशांसाठी हा मोठा इशारा आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
Iran India Relation : इराणचं भारतीयांना मोठं गिफ्ट! ‘व्हिसा’ नसला तरीही मिळणार एन्ट्री