YouTube ची सेवा विस्कळीत, युजर्संना करावा लागला समस्यांचा सामना

YouTube ची सेवा विस्कळीत,  युजर्संना करावा लागला समस्यांचा सामना

YouTube is down today : आज YouTube या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सेवा विस्कळीत झाल्याने अनेक युझर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या 24 तासांपासून अधुनमधून ही समस्या येत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या आलेखानुसार जवळपास 483 YouTube युजर्संना समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्याबद्दल अनेकांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

YouTube Down : यूट्यूब डाऊन झाल्याने नेटीझन्स संतापले; ट्विटरवर व्यक्त केला संताप

अद्याप यावर युट्युबकडून अधिकृत रित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही समस्या नेमकी का येत आहे? याचं उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे युझर्सने वेळोवेळी YouTube सक्रीय असताना रिफ्रेश करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला येत असलेल्या समस्यांचे स्क्रीनशॉट काढून ट्विट करावे जेणे करून YouTube कडून लवकरात लवकर याची दखल घेतली जाईल.

You Tube : भारतीय वंशाचे Neel Mohan असणार यूट्यूबचे नवे सीईओ

गेल्या काही दिवसांपूर्वीच कित्येक तास YouTube युझर्संना YouTube वर व्हिडीओ अपलोड करण्यात समस्या आल्या होत्या. ही समस्या नेमकी काय आहे हे समजत नसल्याने युझर्स चक्रावले होते. पण यावर थेट YouTube च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून उत्तर देण्यात आले. त्यामुळे हे व्हिडीओ अपलोड न होण्यामागील कारण समोर आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube