Mohammed Siraj : एकदिवसीय क्रमवारीत सिराज टॉपवर

  • Written By: Published:
Mohammed Siraj : एकदिवसीय क्रमवारीत सिराज टॉपवर

मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एकदिवसीय ICC गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथमच टॉपवर पोहचला आहे. गेल्या एका वर्षात सिराजने एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे.

खराब कामगिरीमुळे सिराजला तीन वर्षे एकदिवसीय संघात स्थान मिळू शकले नाही. फेब्रुवारी 2022 पासून तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला. यानंतर गोलंदाजाने नियमितपणे आपल्या गोलंदाजीत सुधारणा केला. याचा परिणाम असा झाला की नुकत्याच संपलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड वनडे मालिकेत उत्तम कामगिरीकरत टॉपवर पोहचला आहे.

सिराजने या एका वर्षात 20 एकदिवसीय सामने खेळले आणि एकूण 37 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने अतिशय कडक गोलंदाजी केली. त्याचा इकॉनॉमी रेट 5 च्या खाली राहिला. या गोलंदाजाने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत तो ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ ठरला होता. त्याने 9 विकेट घेत आयसीसी क्रमवारीत तिसरे स्थान गाठले. न्यूझीलंडविरुद्धही त्याने हाच कल कायम ठेवला. येथे त्याने दमदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड यांना मागे टाकले आणि वनडेचा नंबर-1 गोलंदाज म्हणून खिताब मिळवला.

एकदिवसीयमध्ये टॉप चे 10 गोलंदाज

मोहम्मद सिराज – 729 गुण
जोश हेलवुडचे – 727 गुण
ट्रेंट बोल्ड – 708 गुण
मिचेल स्टार्क – 665
राशिद खान – 659
एडम जम्पा – 655
शाकिब अल हसन – 652
शाहीन आफ्रिदी – 641
मुस्ताफिजुर रहमान – 638
मूजीब उर रहमान – 637

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube