‘साप हा सापच असतो…’ पार्थ पवारांच्या एका स्टेटसने राजकीय वर्तुळात खळबळ; नेमका निशाणा कोणावर?
Parth Pawar Insta Status : खासदार पार्थ पवार यांच्या सूचक सोशल मीडिया स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Parth Pawar Insta Status : खासदार पार्थ पवार यांच्या सूचक सोशल मीडिया स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार पार्थ पवार यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या, पण साप हा सापच असतो’, अशा आशयाचा मजकूर त्यांनी आपल्या स्टेटसवर ठेवला आहे. तसेच अशाच आशयाची इन्स्टाग्राम स्टोरीही शेअर केली आहे.
पार्थ पवार यांच्या या सूचक स्टेटसमधून नेमका कोणाला लक्ष्य करण्यात आले आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. डसणारा साप असा उल्लेख करत त्यांनी कोणाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे का? त्यांच्या या पोस्टमागे नेमका कोणता राजकीय संदर्भ आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
खासदार पार्थ पवार यांच्या एका स्टेटसने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात खळबळ उडाली आहे. ‘तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या, पण साप हा सापच असतो’, असा मजकूर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याच आशयाची इन्स्टाग्राम स्टोरीही त्यांनी शेअर केली आहे.
पार्थ पवार यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या स्टेटसमधील ‘साप’ नेमका कोण? त्यांनी कोणाला उद्देशून हा टोला लगावला आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, पार्थ पवार यांनी या पोस्टमधून कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या स्टेटसमागील नेमका संदर्भ काय, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.