PM मोदींना देवाने सुद्बुद्धी द्यावी; त्यांना लेकरु नाही, ना बायको नाही अन्…, अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांचा संताप
Abhijit Dipke : दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी
Abhijit Dipke : दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा 20 वा दिवस असून आज सकाळी त्यांना दिल्ली पोलिसांकडून आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं आहे. तिथून त्यांना आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आंदोलन स्थळावरुन त्यांना हटवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यांच्या या उपोषणाच्या घोषणेनंतर त्यांच्या आई वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना देवाने सद्बुद्धी द्यावी ते आता कुणाच्या मरणाची वाट पाहतायत? त्यांना लेकरु नाही, बायको नाही, त्यांना कसली दया, माया काहीच नाही अशी टीका अभिजीत दिपके यांच्या वडिलांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे.
माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांचे वडील म्हणाले की, आमचं अभिजीतसोबत बोलणं नाही झालं. मागे चार-पाच दिवसापूर्वी बोललो होतो, त्याच्यानंतर बोललं नाही झालं. वडील म्हणल्यावर कोणालाही आपल्या मुलाची चिंता वाटणारच आहे, तशीच मला देखील वडील म्हणून माझ्या मुलाची चिंता वाटते आहे. जो गादीवर बसलेला माणून आहे. जो जिम्मेदार व्यक्ती आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे मी थोडी आशा करतो की, त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी. जे देशातले विद्यार्थी ठिक- ठिकाणी उपोषणाला बसतायत, म्हणजे ते काय कुणाच्या मरणाची वाट पाहता आहेत का? किती जणांनी जीव द्यावा यांच्यासाठी? त्यांना तर लेकरु नाही, ना बायको नाही, यांना कसली दया, माया काहीच नाही. मी देवाजवळ प्रार्थना करतो की, हा जर माणूस असेल.
नरेंद्र मोदी जर माणूस असेल, माणूस या प्राणी गटातला असेल तर त्याला देवाने सुद्बुद्धी द्यावी. त्या विद्यार्थ्यांच बोलणं त्यांनी ऐकून घ्यावं. आम्ही पण मुलासोबत उपोषणाला बसणार आहे. तिथे आम्ही दोघे पण जाणार आहे. मोदी जर माणूस असेल, मनुष्य प्राणी या पृथ्वीतलावर जेवढे जीव असतात, त्याच्यामध्ये एक आहे. मनुष्य प्राणी आणि तो सर्वात बुद्धिमान आहे. विचार करु शकतो, तो योग्य निर्णय घेऊ शकतो. तो जर माणूस असेल तर त्यला देवाने सुद्बुद्धी घ्यावी, नाहीतर त्यांनी स्वत: ला मनुष्य म्हणून घेऊ नये अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके यांच्या वडिलांनी दिली आहे.
तर सरकारने असं करायला नव्हतं पाहिजे, चुकीचं केलं, पोर शांततेत आंदोलन पार पाडत होते. 20 तारखेच्या नंतर त्यांना काय डिसिजन घ्यायचं होतं तर घ्यायचा ना, पण सरकारने सध्या असं नव्हतं करायला पाहिजे. आम्ही 20 तारखेचीच वाट बघत होते, लेकर आता घरी येतील. एक महिना झाला तो बाहेर आहे त्याच्याच टेन्शनमध्ये आम्ही पण आहेत असं अभिजीत दिपकेच्या आईने म्हटलं आहे.