मोठी बातमी! अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांची चौकशी, काय म्हणाले पोलीस?

अरोरा यांच्याशी संबंधित 'डिझाईन बॉक्स'च्या कार्यालयात पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचची टीम दाखल झाली. या पथकाकडून कागदपत्रांची तपासणी केली.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 13T190049.544

राज्यभरात महापालिका निवडणुकांचा प्रचार (Election) आज संपला असूनमतदान दोन दिवसांवर असताना पुण्यातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर पोलीस गेल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांचे क्राईम ब्रांचचे पथक नरेश अरोरा यांच्या कार्यालयात दाखल झाले होते.

अरोरा यांच्याशी संबंधित ‘डिझाईन बॉक्स’च्या कार्यालयात पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचची टीम दाखल झाली. या पथकाकडून कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती समोर येत होती. पण पोलिसांच्या या कारवाईवर आता पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. नरेश अरोरांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

बिबट्याबरोबर लांडगे पण आले, एखादा नासका आंबा असतो, अजित पवारांचा लांडगेंवर वार

दोन दिवसांवर मतदान असताना अचानक पुण्यातील अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राईम ब्रांचची टीम पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या. पोलीस संबंधित कार्यालयात नेमकं का गेले आहेत? ते कोणत्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत? याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. अखेर याबाबत पोलीस आयुक्तांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेबाबत वृत्तावाहिन्यांवर वृत्त प्रसारित झाल्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नरेश अरोरा यांच्यावर कारवाई केलेली नाही, असं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी अधिकारी गेले होते. तक्रारीत तथ्य नसल्याने अधिकारी परतले आहेत”, असंदेखील अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

नरेश अरोरा हे अजित पवार यांचे राजकीय सल्लागार मानले जातात. त्यांची डिझाईन बॉस्क ही कंपनी अजित पवार यांच्यासाठी काम करते. लोकसभा निवडणुकीपासून ही कंपनी अजित पवारांसाठी काम करत आहे. अजित पवारांच्या राजकीय सभांचं नियोजन, अजित पवारांची प्रतिमा जनमानसात कशी जावी, याबाबत रणनीती आखण्याचं काम ही कंपनी करते. तसंच, अजित पवारांच्या निवडणूक प्रक्रियेत या डिझाईन बॉक्स कंपनीचं काम महत्त्वाचं मानलं जातं.

follow us