उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे भाजप अन् शिंदेंच काम, युती अगोदर राऊतांचे घणाघाती वार

एका मराठी रिक्षावाल्याला भर रस्त्यावर मुंबईत मारून दादागिरी केली. हा असं मारण्याचा अधिकार भाजपच्या आमदारांना कोणी दिला?

  • Written By: Published:
News Photo   2025 12 24T113358.932

उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे. (Shivsena) उत्तर भारतीयाना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं काम त्यांचंच आहे. शिवसेनेनं कोणाला इथं विनाकारण मारलं, हल्ला केला हे दाखवून द्यावं, अशा शब्दात पोस्टरबाजीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, परवा भाजप आमदार कोण पराग शहा यांनी मराठी रिक्षावाल्याला मुंबईत मारलं, हे तुम्हाला दिसत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, एका मराठी रिक्षावाल्याला भर रस्त्यावर मुंबईत मारून दादागिरी केली. हा असं मारण्याचा अधिकार भाजपच्या आमदारांना कोणी दिला? ही भाजपचं ही भूमिका आणि धोरण आहे का? की गरीब मराठी माणसाला रस्त्यावर मारायचं?

राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हे सगळे लाचार दिल्लीचे बूटचाटे लोक आहेत. त्या दिल्लीच्या बूटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं, त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये. दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे तो भीतीचा गोळा त्यांच्या पोटामध्ये आलेला आहे, तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतोय, जिभेतून बाहेर पडतोय. जे दिल्लीचे बूटचाटे आहेत, ते प्रॅक्टिस करतायत, चांगल्या प्रकारे दिल्लीचे चे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील यांची त्यांची एक रंगीत तालीम सुरू आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

अगोदर बाळासाहेबांना अभिवादन अन् नंतर पत्रकार परिषद, राज्याच लक्ष लागलेल्या युतीची आज घोषणा

संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन, त्यांना मानवंदना देऊन ऐतिहासिक पर्वाची सुरुवात करतील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आहे, प्रेरणादायी आहे. अशा प्रकारचा मराठी ऐक्याचा मंगल कलश आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला असं चित्र आज संपूर्ण राज्यामध्ये दिसेल, असे ते म्हणाले.

मराठी माणूस एक आहे आणि एक राहील. मराठी माणसाचं नेतृत्व म्हणून उद्धव आणि राज आज त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. त्यांनी पुढे सांगितले की, मुंबई मराठी माणसाची याच्यापेक्षा वेगळा वचननामा असू शकत नाही. मुंबईवर मराठी माणसाचा पहिला हक्क आहे. तसंच, जागावाटपावरून म्हणाले की, जिंकेल त्यांची जागा मेरिटवर, गुणवत्तेवर हे आमचं धोरण आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा आम्ही ते धोरण राबवलं. मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच, इथं आमची जागा वाटपसंदर्भात चर्चा चर्चा संपली आहे.

follow us