इंडिया आघाडीचा मोठा निर्णय! 6 ऑक्टोबरला निवडणुक आयोगाविरोधात मोर्चा

India Alliance : निवडणुक आयोगाविरोधात इंडिया आघाडी 6 ऑक्टोबरला मोर्चा काढणार असुन पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा केली.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 30T144741.923

इंडिया आघाडीनं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुक (Election) आयोगाविरोधात मोठी घोषणा केली आहे. निवडणुक प्रक्रियेबाबतच्या मुद्यांवरुन आता इंडिया आघाडी थेट रस्त्यावर उतरणार असुन येत्या 6 ऑक्टोबर रोजी निवडणुक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातुन निवडणुक आयोगाच्या कारभाराविरोधात इंडिया आघाडी आपली भुमिका मांडणार आहे. पत्रकार परिषदेत या मोर्चाची अधिकृत घोषणा करण्यात आली असुन 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाकडं आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

निवडणूक आयोग अन् एसआयआरविरूद्ध ठाकरे बंधूंचा एल्गार! 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा

इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आघाडीच्या आगामी आंदोलनाचं नियोजन जाहीर केलं. येत्या 6 ऑक्टोबरला इंडिया आघाडीचे खासदार दिल्लीत भारतीय निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

यासोबतच 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात राज्य पातळीवर मोर्चे काढले जाणार आहेत. याच काळात देशातील 5 ठिकाणी मोठ्या रॅलींचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यामुळे निवडणुक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीचं आंदोलन आता देशव्यापी स्वरुप घेणार आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पत्रकार परिषदेत आपली भुमिका स्पष्ट केली. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. ज्ञानेश कुमार यांच्यावर बॅनर्जी यांनी गंभीर आरोप करत त्यांना चोर म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर इंडिया आघाडीनं ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भुमिका घेतल्याचं दिसत आहे. आता ज्ञानेश कुमार याबाबत काय भुमिका घेतात आणि राजीनामा देतात का, याकडं लक्ष लागलं आहे.

follow us