174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मछार यांचा इस्रायलच्या नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान

Indian Pilot Smit Machchhar; कॅप्टन स्मित मछार यांचा इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांच्या नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Indian Pilot Smit Machchhar to Receive Israel Civil Heroism Award

Indian Pilot Smit Machchhar to Receive Israel Civil Heroism Award: तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील मोठा कट, अपघात टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मछार (Smit Machchhar) यांचा इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांच्या नागरी शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग (Isaac Herzog) यांनी गुरुवारी (8 ऑक्टोबर) याबाबत घोषणा केली. विमानातील संकटाच्या वेळी धैर्य दाखवणाऱ्या सहा इस्रायली प्रवाशांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला.

Ahilyanagar Crime: ओढणी ओढून कंबरेजवळ हात लावला… जिल्हा सत्र न्यायालयाने सक्तमजुरीलाच पाठवला!

“आज आम्ही ज्या इस्रायली नागरिकांचा सन्मान करत आहोत, त्यांच्यासोबतच भारताचे कॅप्टन स्मित मछार यांच्याही धैर्याला सलाम करतो. ते लवकर बरे व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यांचं धैर्य, शौर्य आणि व्यावसायिक कौशल्य यामुळे मोठी दुर्घटना टळली,” असं आयझॅक हरझोग म्हणाले.

 

स्मित मछार यांची प्रकृती सुधारल्यानंतर इस्रायलच्या जनतेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करणं आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल, असंही त्यांनी सांगितलं. सहवैमानिकाने विमानाच्या कॉकपिटमध्ये केलेल्या कथित हल्ल्यात स्मित मछार गंभीर जखमी झाले होते. सध्या अबू धाबी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सहा इस्रायली प्रवाशांचाही गौरव

विमानातील कथित हल्ला रोखण्यात मदत करणाऱ्या ताली मानेस, झ्विका मानेस, यानिव हायून, डॉ. शोता मुसायेव, असाफ राजुआन आणि ओर पार्डिलोव्ह या सहा प्रवाशांना राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी नागरी शौर्य पुरस्कार दिला.

‘राज साहेब, तुम्ही म्हणाले चांगली बातमी येईल, विद्यार्थी वाट पाहतायत’; रोहित पवारांनी पोस्ट करुन केल्या भावना व्यक्त!

ताली मानेस यांनी सर्वप्रथम धोक्याची सूचना दिली. त्यानंतर यानिव हायून, झ्विका मानेस, ओर पार्डिलोव्ह आणि असाफ राजुआन यांनी सहवैमानिकाला रोखण्यासाठी मदत केली. डॉक्टर असलेल्या शोता मुसायेव यांनी जखमी वैमानिकाला वैद्यकीय मदत दिली.

“आज आपण अशा सहा सामान्य इस्रायली नागरिकांचा सन्मान करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या धैर्याने असामान्य कामगिरी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठी विमान दुर्घटना टळली आणि 174 प्रवाशांचे प्राण वाचले,” असं आयझॅक हरझोग यांनी सांगितलं.

या संकटाच्या वेळी विमानाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पर्यायी वैमानिकांचे आणि मदत करणाऱ्या इतर प्रवाशांचेही त्यांनी आभार मानले. मात्र, प्रवाशांनी दाखवलेल्या धैर्यामुळे या घटनेच्या सखोल चौकशीची गरज कमी होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

फ्लायदुबईच्या विमानात नेमकं काय घडलं?

गेल्या आठवड्यात फ्लायदुबईचं एफझेड 1073 हे विमान दुबईहून इस्रायलकडे जात होतं. विमानात 174 प्रवासी होते. यावेळी ओमानचा नागरिक असलेल्या हमाम अल-हमामी या सहवैमानिकाने कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित मछार यांच्यावर विमानातील आपत्कालीन कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे.

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक!

या घटनेनंतर विमानातून आपत्कालीन संदेश पाठवण्यात आले. विमानाची उंची 34 हजार फुटांवरून अचानक 17 हजार फुटांपेक्षा जास्त कमी झाली. त्यानंतर सौदी अरेबियातील विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. संयुक्त अरब अमिरातीने या घटनेला दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न म्हणून वर्गीकृत केलं.

कॅप्टन मछार यांना सुरुवातीला सौदी अरेबियातील तबूक येथे उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी अबू धाबी येथे हलवण्यात आलं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही मंगळवारी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, स्मित मछार यांची प्रकृती सुधारत आहे आणि उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत. संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावास त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबीयांशी आणि रुग्णालय प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे.

नेतान्याहू यांनीही केलं होतं कौतुक

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कॅप्टन मछार यांच्याशी संवाद साधला होता. या प्रसंगातील त्यांच्या धैर्याचं कौतुक करत नेतान्याहू यांनी त्यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅप्टन मछार यांनी या कार्यक्रमात ज्योत प्रज्वलित करावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ज्योत प्रज्वलित करण्याचा मान हा देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. सहसा हा मान इस्रायली नागरिकांना दिला जातो. मात्र, कॅप्टन मछार यांच्याबाबतीत इस्रायलचे नागरिक त्यांना आपलाच नायक मानतील, असं नेतान्याहू यांनी म्हटलं होतं.

अमेरिकेचा भारतीय IT कंपन्यांना मोठा दणका! 6 कंपन्यांवर कारवाई, भारतीयांचं ग्रीन कार्ड अडकणार?

राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हमासच्या हल्ल्यानंतर नागरी शौर्य पुरस्काराची स्थापना केली होती. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी असामान्य धैर्य दाखवणाऱ्या नागरिकांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो.

follow us