‘राज्यात JN 1 चे 45 नाही तर ‘एवढे’ रुग्ण’; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी दिली माहिती

‘राज्यात JN 1 चे 45 नाही तर ‘एवढे’ रुग्ण’; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी दिली माहिती

JN 1 Corona Update : राज्यात कोरोनाच्या JN 1 व्हेरियंटचे राज्यात 45 नाहीतर फक्त एकच रुग्ण आढळून आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली आहे. JN 1 या नव्या व्हेरियंटच्या (JN 1 Corona Update) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ, आरोग्यमंत्री आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत तानाजी सावंत बोलत होते.

…तर आपणच आपल्या पायावर दगड पाडल्यासारखं होईल, जरांगेंच्या डेडलाईवर शंभुराज देसाईंनी सुनावले

मंत्री सावंत म्हणाले, हिवाळी अधिवेशनात आम्हाला नव्या व्हेरियंटबाबत माहिती मिळाली आहे. त्यानंतर तत्काळ आम्ही आरोग्य विभागाला सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून आरोग्य विभागाला मॉक ड्रील घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी स्पष्ट केलं आहे.

मोठी बातमी! हायकोर्टाचा मराठा समाजाला दिलासा, EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा

टास्क फोर्सची स्थापना :
राज्यात ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट आला असून या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. तज्ञांच्या मदतीने JN 1 चा अभ्यास केल्यानंतर टास्क फोर्सच मार्गदर्शन करणार आहे. त्यानूसार राज्यात उपाययोजन राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती तानाजी सावंतानी दिली आहे.

एक रुग्णाला नव्या व्हेरियंटची लागण :
राज्यात एका रुग्णाला नव्या व्हेरियंटची लागण झाली असून त्याचं विलगीकरण करण्यात आलं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना लागण झालीयं का? त्याची तपासणी सुरु करणार आहोत. इतही भागांत तपासणी सुरु असून अद्याप तपासणीत रुग्ण आढळून आलेले नाहीत. या व्हेरियंटबद्दल सोमवारी सर्व तपशील मिळणार असल्याचंही सावंत म्हणाले आहेत.

नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात बेड, ऑक्सीजन बेड आणि डॉक्टरांसह मनुष्यबळ सज्ज असून टेस्टिंग किट राज्यात पुरेसे उपलब्ध आहेत. आज सर्वच ठिकाणचा आढावा घेण्यात आला आहे. यासंदर्भात सीएसडीएचओंसोबत दररोज एक तास आढावा घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

मास्क वापरण्याचं आवाहन
सध्या नाताळ आणि नवीन वर्षांचा काळ सुरु आहे. त्यामुळे जनतेने मास्क वापरुन स्वत:ची काळजी घ्याव, हा व्हेरियंट सौम्य असून राज्यातील जनतेला घाबरुन जाऊ नये, असंही आवाहान राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube