Lok Sabha Election 2024 : मतदानासाठी ‘ही’ 12 प्रकारची ओळखपत्र ग्राह्य धरली जाणार

Lok Sabha Election 2024 : मतदानासाठी ‘ही’ 12 प्रकारची ओळखपत्र ग्राह्य धरली जाणार

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्यक्ष पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रत्यन करत आहे. तर दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) अनेक प्रत्यन करत आहे. आता निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा करत मतदारांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती दिली आहे .

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर (Ahmednagar Lok Sabha Constituencies) व शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituencies) 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्राशिवाय पारपत्र (पासपोर्ट ), वाहन चालक परवाना (लायसन्स ), केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे फोटो असलेले ओळखपत्र, बँक, टपाल विभागातर्फे फोटोसह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड, तसेच मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड, भारत सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, फोटो असलेले निवृत्तीवेतनाची कागदपत्रे, खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड,(Aadhaar Card) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube