माझ्या उमेदवारांना 15 कोटींची ऑफर; ठाण्यातील सभेत राज ठाकरेंचा भाजपवर थेट प्रहार

राज ठाकरे ठाण्यात महानगरपालिकेच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते राऊत उपस्थित होते.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 12T204539.922

भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायेत आणि शिवसेना शिंदे (Thane) गटाचे लोक पकडतायेत असं वातावरण सुरू आहे. एका एका घरात पाच पाच हजार वाटले जात आहेत. मला हे जे पैसे घेत आहेत त्यांची चिंता आहे, पैसे वाटत आहेत त्यांची नाही. आपण पाच-पाच हजार रुपयांना विकलो जात असलो तर मुलं बाळ काय म्हणतील? आपली आई- आपले वडिलं पाच हजारात विकले गेले, हे जर होत असेल तर काय उत्तर देणार आहोत आपण असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. ते ठाण्यात महानगरपालिकेच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, भाजपने एका घरातील शैलेश धात्रक मनिषा धात्रक, पुजा धात्रक या तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर दिली. ही ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे आहेत असा खळबळजनक खुलासा राज ठाकरे यांनी केला. दरम्यान, राजश्री नाईक यांना 5 कोटींची ऑफर झाली होती. ती नाकारून त्या उभ्या आहेत. त्यांना तर यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपीठावरच उपस्थित केलं. राज यांनी केलेल्या पुराव्यांसहीत आरोपांनी मोठी खळबळ उडाली आहे. या लोकांना कुणाचाच लागम राहिलेला नाही अस म्हणत राज यांनी यावेळी भाजपवर गंभीर आरोप केले.

follow us