दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, असं तपासा लाभार्थ्याचं नाव

farmers loan waiver list सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Farmers Loan Waiver List

Relief for farmers amidst drought Third loan waiver list announced how to check beneficiary names : राज्यात एकीकडे पावसा अभावी दुष्काळ पडला असून पीक करपून गेली आहेत. जनावरांसह माणसांच्या देखील पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यात मात्र शेतकऱ्यांना एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या यादीमध्ये तुमचं किंवा लाभार्थी शेतकऱ्याचं नाव कसं तपासायचं जाणून घ्या सविस्तर…

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पराभव होताच लक्ष्मीदर्शनाचा वार; मावळत्या अध्यक्षांचा विजयी पॅनेलवर वादळी आरोप

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी सोमवारी 12 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्यावरील थकबाकीची पडताळणी करून जवळच्या ‘आपले सेवा केंद्रा’त जावे आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. या प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

यादी कुठे पाहता येईल?

तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी संबंधित बँकांच्या शाखांमध्ये, विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी आपले नाव तपासता येईल. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कर्जखात्यावरील थकबाकीची खातरजमा करावी. त्यानंतर जवळच्या ‘आपले सेवा केंद्रा’त जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने किंवा ओटीपीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाईल.

follow us