Unmesh Patil News : महायुतीला जळगावचा पेपर टफ! भाजपवर हल्लाबोल करत उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Unmesh Patil News : महायुतीला जळगावचा पेपर टफ! भाजपवर हल्लाबोल करत उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Unmesh Patil News : जळगावचे खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी आज भारतीय जनता पक्षातून (BJP) राजीनामा देत ठाकरे गटात (UBT) प्रवेश केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपकडून यावेळी उन्मेश पाटील यांचे तिकीट कापण्यात आले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षाला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

Arvind Kejriwal पुन्हा अडचणीत? ‘त्या’ याचिकेला उच्च न्यायालयात ईडीने केला विरोध

आज त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ( ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी त्यांनी आपण शिवसेनेमध्ये तिकीटसाठी नाहीतर स्वाभिमानासाठी आलो असल्याचे सांगतिले. बदल्याचं राजकारण फार वेदना देणारा आहे. या कठीण काळात मला उद्धव ठाकरे यांनी आधार दिला असं त्यांनी यावेळी सांगितले.

“और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी

तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत भाजपचं राजकारण वापरा आणि फेकून द्या असल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेनेमध्ये उन्मेश पाटील यांचा स्वागत केला.

दरम्यान जळगाव मतदारसंघातून भाजप खासदार उन्मेश पाटील तिसऱ्यांदा इच्छुक होते. परंतु, भाजपने त्यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाटील काही दिवसांपासून नाराज होते. तेव्हापासूनच ते शिवसेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेश करु शकतात, अशी चर्चा होती. आता त्यांना ठाकरेंकडून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube