Video : मी फडणवीसांना मुख्यमंत्र्याचं मंत्री केलं; पवारांची ‘लेट्सअप’ वर दणकेबाज मुलाखत!

  • Written By: Published:
Video : मी फडणवीसांना मुख्यमंत्र्याचं मंत्री केलं; पवारांची ‘लेट्सअप’ वर दणकेबाज मुलाखत!

मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांना (Sharad Pawar) राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. पवार कधी काय भाकरी फिरवतील याचा आजपर्यंत कुणालाच अंदाज आलेला नाही. आपणच फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्याचं मंत्री केलं असा गौप्यस्फोट पवारांनी लेट्सअपच्या Exclusive मुलाखतीत केला असून, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या भूमिकेवर परखड मत व्यक्त केलं आहे. तर, बंडखोरी करत राष्ट्रवादी फोडणाऱ्या अजितदादांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी घेतलेली पवारांची विशेष मुलाखत आज (दि.6) रात्री नऊ वाजता प्रकाशित होणार आहे. (Sharad Pawar Exclusive Interview )

Devendra Fadnavis : राजीनाम्याचं काय झालं? फडणवीसांनी दिल्लीतील स्टोरी सूचक शब्दांत सांगितली

मोदींची प्रचारची पद्धत योग्य नव्हती

पवारांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवर परखड मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मोदींच्या प्रचाराची जी मोहीम होती ती माझ्या मते योग्य नव्हती. मोदी आणि मोदी सरकार यांच्याबद्दलचा भ्रमनिरास झालेले चित्र या निवडणुकीत आपल्याला पाहण्यास मिळाले. काहीही करून सत्ता टिकवायची हेच धोरण आज मोदींचं दिसत असल्याचेही मत पवारांनी स्पष्टपणे व्यक्त केले.

लाडक्या बहिणीचं काय झालं हे सर्वांनी बघितलं

पवारांनी पुढे बोलताना लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या निकालावरही भाष्य केले. बारामतीत पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. मात्र, या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी विजयी होत बाजी मारली. यावर बोलताना पवार म्हणाले की, वर्षानुवर्ष झाले बारामतीकर योग्य निर्णय घेतात आणि कालच्या निवडुकीत अजितदादांच्या लाडक्या बहिणीबाबतीत काय झाले हे सगळ्या राज्याने बघितल्याचे पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार राज्यसभेवर; अजितदादांच्या डोक्यात बारामतीचे लॉन्ग टर्म पॉलिटिक्स

अजित पवारांचं कौतुक अन् कानउघडणी

अजितमध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे त्याची कष्ट करण्याची तयारी असते अशी कौतुकाची थापही पवारांनी अजितदादांना दिली. तर, दुसरीकडे त्यांची कानउघडीदेखील केली. लोकांच्या समोर मते मागतांना ती कशासाठी, कोणत्या पक्षासाठी आणि कोणत्या विचारासाठी मागितली हे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ सात्यत्य नाही. त्यामुळे राजकारणात काहीही झालं तरी सातत्या पाहिजे असे म्हणत पवारांनी अजितदादांची कानउघडणी केली.

जे सोडून गेले त्यांचा सर्वांचा पराभव केला

यावेळी पवारांनी राष्ट्रवादीतील बंडखोरीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, काही लोक दबावाने किंवा आणखी कशाने गेले असतील. तर, त्यांचा वेगळा विचार करावा लागतो पण सरसकट नाही. संकट येतात पण त्यानंतरच्या निवडणुकीत मला सोडून गेले त्या सर्वांचा मी पराभव केला आणि पुन्हा तेवढी संख्याही केली असे पवारांनी ठणकावून सांगितले.

Video : अजितदादांचा मूड बदलला! वडेट्टीवारांंसाठी खास शायरी अन् खळखळून हसलं सभागृह

पवारांनी ठेवलं फडणवीसांच्या दुखऱ्या नसेवर बोट

पवारांनी दोन वर्षापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडावरही भाष्य करत फडणवीसांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. ते म्हणाले की, बंडखोरीनंतर कोणाचा Era संपला हे त्यांना नुसतं कळलं नाही तर, नव्या सरकारमध्ये त्यांनी सत्ता घेतली पण, फडणवीसांना मुख्यमंत्र्याचं मंत्री व्हाव लागलं असे पवार म्हणाले. मुलाखतीदरम्यान पवारांनी निवृत्ती महाराजांची नक्कलदेखील करून दाखवली.

संपूर्ण मुलाखत कुठे आणि कधी बघता येणार?

लेट्सअप मराठीला पवारांनी दिलेली ही दणकेबाज मुलाखत वाचकांना आज (दि.6) रात्री नऊ वाजता लेट्अपच्या युट्यूब चॅनल, फेसबूक आणि वेबसाईटवरही पाहता आणि ऐकता येणार आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज