बॅंक ऑफ बडोदामध्ये 38 जागांसाठी भरती, महिन्याला 69 हजार रुपये पगार, जाणून घ्या तपशील

  • Written By: Published:
बॅंक ऑफ बडोदामध्ये 38 जागांसाठी भरती, महिन्याला 69 हजार रुपये पगार, जाणून घ्या तपशील

Bank of Baroda Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बँकेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 19 जानेवारी 2024 पासून सुरक्षा व्यवस्थापक (Security Manager) पदासाठी भरती सुरू केली आहे. व्यवस्थापक पदासाठी एकूण 38 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2024 आहे.

INDIA सारखी आमच्या आघाडीची अवस्था होऊ देणार नाही! एन्ट्री होताच आंबेडकरांनी स्वीकारले ‘मविआ’चे पालकत्व 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वी तुम्हाला अर्ज करावा लागेल. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पदाचे नाव: सुरक्षा व्यवस्थापक

पदांची संख्या: 38 जागा

एससी – 5 जागा
एसटी – 2 जागा
ओबीसी – 10 जागा
EWS – 3 जागा
UR: 18 जागा

शैक्षणिक पात्रता :

बँक ऑफ बडोदामधील या रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारास आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमीत कमी पाच वर्षांच्या सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे.

निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली, गाव चलो अभियानाची घोषणा 

वय श्रेणी :

बँक ऑफ बडोदामधील सुरक्षा व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे दरम्यान असावे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 फेब्रुवारी 2024

पगार :

जे उमेदवार या पदासाठी अर्ज करतील आणि निवडले जातील त्यांना दरमहा रुपये 49,910 ते 69,810 रुपये दिले जातील.

आवश्यक कागदपत्रे –
या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी बायोडेटा, 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

सूचना –
https://www.bankofbaroda.in/-/media/Project/BOB/CountryWebsites/India/Career/2024/24-01/Detailed-Advertisement-Security-Officers-19-01-2024-18-19.pdf

निवड प्रक्रिया:

निवड होण्यासाठी, उमेदवाराला ऑनलाइन चाचणी, सायकोमेट्रिक किंवा इतर कोणत्याही चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल. यामध्ये पुढे गेलेल्या उमेदवारांची गटचर्चा किंवा ऑनलाइन परीक्षेद्वारे मुलाखत घेतली जाऊ शकते. सर्व प्रक्रियेमधून निवडलेल्या उमेदवारांना 12 महिन्यांच्या म्हणजेच एक वर्षाच्या प्रोबेशनवर सक्रिय सेवेसाठी बँकेत रूजू केले जाईल.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube