Dhantrayodashi 2023 : …म्हणून आज धनत्रयोदशीच्या दिवशी यमदिप दानाला आहे विशेष महत्त्व

Dhantrayodashi 2023 : …म्हणून आज धनत्रयोदशीच्या दिवशी यमदिप दानाला आहे विशेष महत्त्व

Dhantrayodashi 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2023) गुरूवारी वसुबारसेपासून दिवाळीला सुरूवात झाली. तर आजच्या धनत्रयोदशीच्या दिवसाला दिवाळीत विशेष महत्त्व आहे. याला छोटी दिवाळीही म्हटले जाते. या दिवशी यमदिप दान केले जाते. पद्म पुराणात सांगितल्याप्रमाणे आणि चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आजच्या दिवशी दक्षिण दिशेकडे यमासाठी दिवा लावला जातो. जेणे करून अकाल मृत्यू नष्ट होतो.

…नंतर खुशाल आरक्षण वाढवा; जरांगे पाटलांनी दिला भुजबळांना ‘मास्टर’ फॉर्मुला

आरोग्य देवता धन्वंतरी कुबेर पुजन…

या दिवशी समुद्रमंथनातून अमृताचे भांडे बाहेर पडले आणि देवांचे वैद्य धन्वंतरी हे अमृत पात्र घेऊन प्रकट झाले. त्यामुळे आरोग्यासाठी या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. हा दिवस कुबेराचाही दिवस मानला जातो. या दिवशी धन-समृद्धीसाठी कुबेर देवाची पूजा केली जाते. सुख समृद्धीसह आरोग्याची देखील कामना यातून केली जाते.

Air Pollution : प्रदूषण रोखण्याच्या ‘मुंबई पॅटर्न’वर नेटकऱ्यांचा संताप, बौद्धिक दिवाळखोरी म्हणत केलं ट्रोल…

नवे भांडे वस्तू घेण्याची परंपरा…

या दिवशी सोने, चांदी आणि भांडी खरेदी करण्याचे खूप महत्त्व आहे. नवीन भांड्यात कोथिंबीर भरून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे. याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मीच्या रूपात झाडू किंवा केरसुणीची पूजा केली जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-शांती राहते आणि संपत्ती वाढते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube