रेल्वे विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 18 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
East Central Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेचे (Indian Railway) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वेच्या या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आताही रेल्वेने एक भरती (Railway Bharti) प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्व मध्य रेल्वेने 56 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
Bade Miyan Chote Miyan चे टायटल ट्रॅक आऊट! अक्षय-टायगरची खास केमेस्ट्री दिसली
क्रीडा व्यक्ती या पदांच्या तब्बल 56 रिक्त आहेत.या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. क्रीडा कोट्याअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि या पदांसाठी त्वरित अर्ज करावेत. दरम्यान, या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
पदाचे नाव – संबंधित भरती क्रिडा व्यक्ती या पदासााठी सुरू आहे.
पदांची संख्या- क्रीडा व्यक्तीच्या पदासाठी एकूण 56 रिक्त जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता –
पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट https://Indianrailways.gov.in/ वर भेट देऊ शकतात.
वयोमर्यादा – या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे
अर्ज प्रक्रिया –
अर्ज करण्याची पध्दत ऑफलाइन आहे. त्यामुळे अर्जाची शेवटची तारीख लक्षात घेऊन लवकरात लवकर अर्ज करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
26 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत संकेतस्थळ –
अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट https://Indianrailways.gov.in/ ला भेट देऊ शकतात.
वेतन – या पदांसाठी वेतन 18,000 रुपये आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवडलेल्या झालेल्या उमेदवाराला भारतात नोकरी करावी लागेल.
अर्ज कसा करायचा?
उमदेवारांना आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रेही जोडावी.
दहावी -बारावीची गुणपत्रक, शाळा सोडल्यचाा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे जोडावा.
अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत वेबसाइट https://Indianrailways.gov.in/ वर दिलेली तपशीलवार माहिती वाचा.