भावी तलाठ्यांसाठी खुशखबर! नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध, कोणत्या जिल्ह्यात किती जागा?
तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमदेवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, तलाठी पदासाठी राज्यातल्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
PM मोदींनी अमेरिका दौऱ्यात कोणते करार केले? मोदी-बायडेन यांच्या मैत्रीचा देशाला काय फायदा होणार?
तलाठी पदाच्या भरतीसाठी उमेदवारांना येत्या 26 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी एकूण २२ दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 जुलै रोजी शेवटची तारीख असणार आहे.
‘मी तिकीट खरेदी करूनही…’ महाभारत फेम गजेंद्र चौहान Adipurush वर संतापले
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 1 हजार रुपये असून मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. दरम्यान, उमेदवारांना परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. उमेदवारांने आपला अर्ज आणि परीक्षा शुल्क भरल्यानंतर महसूल विभागाच्या संकेतस्थळावर परिक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
‘होय, कोरोनाची लस मोदींनीच तयार केली’; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले!
कोणत्या जिल्ह्यात किती जागा?
औरंगाबाद -161
जालना -118
परभणी-105
हिंगोली-76
नांदेड-119
बीड-187
लातूर-63
उस्मानाबाद-110
नागपूर-177
वर्धा-78
भंडारा-67
गोंदिया-60
चंद्रपूर-167
गडचिरोली-158
अमरावती-56
अकोला-41
वाशिम-19
बुलढाणा-49
यवतमाळ-123
पुणे-383
सातारा-153
सांगली-98
सोलापूर-197
कोल्हापूर-56
नाशिक-268
धुळे-205
नंदुरबार-54
जळगाव-208
अहमदनगर-250
मुंबई शहर-19
मुंबई उपनगर-43
ठाणे-65
पालघर-142
रायगड-241
रत्नागिरी-185
सिंधुदुर्ग-143
परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणं आवश्यक आहे. उमेदवाराची संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. यासोबतच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक उमदेवारांना आवश्यक प्रमाणपत्रे पीडीएफ फाईलमध्ये ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत.
पंजाबचं तूप, गुजरातचं मीठ मोदींनी बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये महाराष्ट्रातील ‘ही’ वस्तू
तसेच वयाच्या अटीसंदर्भात प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 38 पेक्षा अधिक नसावे. तर मागासवर्गीय उमेदवारांचे वय 43 पेक्षा अधिक नसावे, असा उल्लेख जाहिरातीच्या प्रसिद्धीप्रत्रकामध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून तलाठी पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यासंदर्भातील जाहिरात महसूल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.