Government Schemes : शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ कसा घ्याल?

Government Schemes : शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ कसा घ्याल?

Government Schemes : आपण आज शेतमाल तारण कर्ज योनजेविषयीची (Agricultural Mortgage Loan Scheme)माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला अशा प्रकारच्या कर्जाचा लाभ घ्यायचा असेल, तर ही माहिती नक्की वाचा. आज आपण या योजनेचे उद्दिष्ट्य काय? कोणत्या शेतमालासाठी कर्ज घेता येईल? त्याची परतफेड कालावधी आणि व्याजदर किती असणार? तसेच लागू अटी व शर्ती कोणत्या असणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेच्या गुलाबी अनारकली ड्रेसमधील लूकवर चाहते फिदा

शेतमाल तारण कर्ज योजनेचे उद्दिष्ट्य :
– सन 1990-91 पासून कृषी पणन मंडळाद्वारे शेतकऱ्यांसाठी (Farmer)राबविण्यात येत आहे. शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक गाव पातळीवर स्टेटीतून निघालेला शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा नसतात. त्यामुळे शेतीमालाचे काढणी नंतरच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येतात.
– त्याच वेळेला सर्वांचे शेतमाल एकत्र आल्याने शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. शेतकऱ्यांना शेतमाल साठवणून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास, त्या शेतमालास जास्त बाजार भाव मिळू शकतो आणि शेतकऱ्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.
– यासाठीच जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव आणि नफा मिळावा, या दृष्टीकोनातून विचार करून शेतकरी तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

या कर्जासाठी कोणत्या शेतमालाचा समावेश आहे?
सदर योजने अंतर्गत कर्जासाठी मूग, गहू, बेदाणा, उडीद, सोयाबीन, चना, तूर, भात (धान), करडई, ज्वारी, सुर्यफूल, बाजरी, मका, काजू बी, हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असून सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असून, 6 महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3% व्याज दारात सवलत देण्यात येते.

Israel Hamas War : भारताचं मोठं पाऊलं; इस्त्रायल-हमास युद्धविराम नाकारत कॅनडाला दिलं समर्थन

शेतमाल तारण कर्ज योजनेच्या लागू अटी :
– सदर कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचाच शेती माल स्विकारला जाणार आहे. फक्त शेतकऱ्यांनाच या कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत व्यापाऱ्यांचा माल स्विकारला जात नाही.
– शेतकऱ्याने बाजार समितीकडे तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक, देखरेख व सुरक्षा जबाबदारी संबंधित बाजार समितीची असणार आहे. ती विनामुल्य आहे. त्यासाठी शेतकऱ्याला अतिरिक्त रक्कम अडा करायची गरज नसणार आहे.
– शेतकऱ्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्यादिवसाचे चालू बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल, ती ठरविण्यात येते.
– कर्जासाठी तारण ठेवलेल्या शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी ही त्या संबंधीत बाजार समितीची असणार आहे.

कसे मिळेल शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत कर्ज?
– संबंधित शेतकरी बांधवाला वखार महामंडळाच्या गोदामात ऑनलाईन/ऑफलाइन अर्जाद्वारे तारण कर्ज मिळेल.
– कर्जाची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल.
– या योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि लाभ मिळविण्यासाठी आपल्या जवळील वखार महामंडळाच्या गोदामाला भेट द्यावी.
– वखार महामंडळाच्या अधिकारी यांना भेटून या शेतमाल तारण कर्ज योजनेचा सर्व शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा.

शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी लागणारे कागदपत्र
– शेतकरी बांधवाचे आधार कार्ड
– शेतकरी बांधवांच्या नावावरील सातबारा
– बँक वचनचिठ्ठी
– सभासदत्व अर्ज
– पॅन कार्ड

कर्जाची परतफेड मुदत आणि व्याजदर किती? :
– तारण कर्ज योजनेच्या कर्जाची परतफेड मुदत 6 महिने म्हणजेच 180 दिवस असून तारण कर्जास व्याजाचा दर 6% आहे.
– बाजार समितीकडून कृषी पणन मंडळास 3% प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरीत 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). ठरून दिलेल्या मुदतीत कर्ज न फेडल्यास व्याज सवलत शेतकऱ्याला मिळणार नाही.
– महिने (180 दिवस) मुदतीनंतर 6 महिन्यापर्यत 8% व्याज दर व त्याचे पुढील 6 महिन्याकरिता 12% व्याजदर आकारला जातो.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube