डिजीटल अरेस्टवर सरकारचा सर्जिकल स्ट्राइक! व्हाट्स अ‍ॅपवरील ‘ते’ अकाऊंट्स बंद केले जाणार

digital arrest accounts on WhatsApp डिजीटल अरेस्ट करणाऱ्या डिव्हाइसेसमधील व्हाट्स अ‍ॅपवरील अकाऊंट्स बंद केले जाणार आहेत.

Digital Arrest Accounts On WhatsApp

Government’s surgical strike on digital arrest accounts on WhatsApp will be closed : ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून सामान्य नागरिकांची (Election) फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या फसवणुकीबाबत केंद्र सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता या डिजीटल अरेस्ट करणाऱ्या डिव्हाइसेसमधील व्हाट्स अ‍ॅपवरील अकाऊंट्स बंद केले जाणार आहेत. नेमका काय आहे सरकारचा निर्णय जाणून घ्या सविस्तर…

भोंदू बाबा अशोक खरात ठरला ‘निमित्त’; चाकणकरांच्या खुर्चीला सुरुंग नेमका लावला कुणी?

डिजीटल अरेस्टवर केंद्र सरकारने आता बडगा उगारला आहे. सरकारने व्हाट्सअपला डिजिटल अरेस्ट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या डिव्हाइसवरील अकाउंट ब्लॉक करण्याच्या आदेश दिले आहेत. कारण डिजिटल अरेस्टमधील बहुतांश फेक कॉल हे व्हाट्सअपच्या माध्यमातून लोकांना केले जातात.

ट्रॉलीमध्ये बिबट्या अन् तरुणाचा एकत्र मुक्काम; श्रीगोंद्यात किर्रर्र अंधारात घडला थरकाप उडवणारा प्रसंग

तर सरकारच्या या आदेशानंतर व्हाट्सअपकडून त्यांच्या प्लॅटफॉर्म स्काइपप्रमाणे सेफ्टी फीचर्स लागू करण्याचा विचार केला आहे. आयटी रूल्स 2021 नुसार डिलीटेड अकाउंट 180 दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवलं जाईल. त्यातून तपास यंत्रणांना तपास करण्यासाठी मदत मिळेल. तसेच धोकादायक आणि बनावट ॲप यांना ओळखून त्यांना ब्लॉक करता येईल.

हाय-टेक आर्मी ग्रेड मोबाईलमागचं काळं जाळं; अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

याबाबत इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली. त्यामध्ये म्हटले आहे की, केंद्रिय गृहमंत्रालयाकडून यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ज्या समितीने व्हाट्सअपला डिजिटल अरेस्टच्या धोक्यापासून वाचण्यासाठी काही खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्यामध्ये फसवणूक करण्यासाठी आणि तोतया पोलीस अधिकारी बनवून लोकांना फसवणाऱ्या अकाउंटवर का कारवाई केली जाईल. या समितीच्या या सूचनांवर व्हाट्सअपने सहमती दाखवली आहे. त्यावर आता लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत डिसेंबर 2025 मध्येच बैठक घेण्यात आली होती.

डिव्हाइस आयडी म्हणजे काय?

डिव्हाइस आयडी म्हणजे कोणत्याही गॅझेटची ओळख असते. जो युनिक नंबर असतो. हा नंबर ज्याप्रमाणे नागरिकांच्या आधार कार्डचा नंबर असतो त्याचप्रमाणे असतो. ज्यामध्ये आयएमइआय नंबर, मॅक ऍड्रेस, डिवाइस सिरीयल नंबर हे असू शकतं, आयएमइआयनंबर मोबाईल नेटवर्कवरून फोनची ओळख पटवतो. तर मेक ऍड्रेस वाय-फाय ओळखीसाठी वापरलं जातं.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

डिजिटल अरेस्ट हा एक असा फसवणुकीचा स्कॅन आहे. ज्यामध्ये आरोपी हे लोकांना आम्ही पोलीस आहोत किंवा जज आहोत असे सांगून पिडीतांना घाबरवतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यासाठी जास्तीत जास्त व्हाट्सअपचा वापर केला जातो. या पिडीतांना विविध धमक्या देऊन ब्लॅकमेल केलं जातं. त्यांना अटक करण्याची धमकी दिली जाते. त्यासाठी चौकशीसाठी दुसऱ्या शहरातही बोलवलं जातं. पिडीत व्यक्ती पोहोचू शकत नसल्यास. त्याला डिजिटल तपासामध्ये मदत करण्याची सांगितले जाते आणि त्याच्याकडून संपत्तीची लूट केले होते.

follow us