भारतात ‘या’ भयंकर आजाराचं थैमान! तरूणांची संख्या अधिक, ‘हे’ खाणं आताच बंद करा

भारतात ‘या’ भयंकर आजाराचं थैमान! तरूणांची संख्या अधिक, ‘हे’ खाणं आताच बंद करा

 

Buerger Disease Symptoms Causes Treatment In Detailed : सिगारेट ओढणे (Smoking) किंवा तंबाखू खाणे, हे केवळ फुफ्फुसांना आणि तोंडाला हानी पोहोचवत नाही, तर कर्करोगासारखे गंभीर आजार देखील होऊ (Health Tips) शकते. धूम्रपानामुळे एक दुर्मिळ आजार देखील होऊ शकतो. यामुळे हात आणि पाय कापण्याची वेळ येवू शकते. या आजाराचे नाव बुर्गर डिसीज (Buerger Disease) आहे.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असं म्हटलंय की, जगभरातील प्रत्येक लाखात 12-20 लोक या आजाराने ग्रस्त आहेत. भारत-अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळतात. हा आजार काय आहे आणि त्यामुळे कोणते धोके होऊ शकतात? हे सविस्तर जाणून घेऊ या.

विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी मारहाण अन् उपाशी ठेवायचा; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या बायकोचे गंभीर आरोप

बुर्गर रोग म्हणजे काय?

बुर्गर रोगाला वैद्यकीय भाषेत थ्रोम्बोअँजायटिस ऑब्लिटेरन्स म्हणतात. यामध्ये शरीराच्या लहान आणि मध्यम आकाराच्या नसा, विशेषतः हात आणि पायांच्या नसा सुजतात. हळूहळू या नसांमधील रक्तप्रवाह थांबतो आणि ऊतींना नुकसान होऊ लागते. यामुळे हात आणि पाय सुन्न होऊ लागतात, जळजळ होते, अल्सर होतात. गंभीर प्रकरणांमध्ये शरीराचे अवयव कापण्याचीही शक्यता असते.

खळबळजनक ! बीडमध्ये तरूणीने स्वत:च्या लग्नाच्या दिवशीच मामाच्या घरात घेतला गळफास, धक्कादायक कारण…

बुर्गर रोगाचे सर्वात मोठे कारण?

90 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये तंबाखू, हे या आजाराचे कारण असल्याचं स्पष्ट झालंय. सिगारेट, बिडी, गुटखा, पान मसाला, निकोटीन असलेल्या सर्व गोष्टी रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात. तरुणांमध्ये हा आजार झपाट्याने वाढतो. कारण आता धूम्रपानाच्या सवयी लहान वयातच सुरू होत आहेत. WHO च्या मते, भारतात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सुमारे 25.3 कोटी लोक धूम्रपान करतात. यामुळे, इतर देशांपेक्षा येथे बर्गर रोगाचा धोका जास्त आहे.

आजाराची लक्षणे काय?

– हात आणि पाय थंड वाटणे
– चालताना पायाच्या बोटांमध्ये वेदना होणे
– बोटांवर सूज किंवा व्रण येणे
– नसा मुरगळणे
– पायांचा रंग बदलणे
– अल्सर किंवा गाठी तयार होणे

बुर्गर रोग धोकादायक का?

या आजारामुळे शिरा हळूहळू बंद होतात. जर संसर्ग वाढला तर त्यामुळे अंगविच्छेदन देखील होऊ शकते. उपचारात विलंब झाल्यास मृत्यूचा धोका देखील वाढू शकतो. एकदा आजार झाल्यानंतर पूर्णपणे बरे होणे कठीण होते.

हा आजार कसा रोखता येईल?

तंबाखूपासून पूर्णपणे दूर राहा, हे सर्वात महत्वाचे संरक्षण आहे. धूम्रपान सोडण्यासाठी, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीची मदत घ्या. नियमित आरोग्य तपासणी करा. कोणत्याही जखमा किंवा कटांकडे दुर्लक्ष करू नका. दैनंदिन दिनचर्येत निरोगी आहार आणि शारीरिक हालचालींचा समावेश करा.

टीप – हा लेख केवळ माहितीसाठी आहे. अधिक संदर्भासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube