डोळ्यांत जळजळ अन् धूसरपणा तुम्हालाही जाणवतो? मग, सावध व्हा ‘या’ टिप्स फॉलो कराच!

Digital Eye Strain : डिजिटल आय स्ट्रेन एक डोळ्यांची (Digital Eye Strain) समस्या अलीकडच्या काळात उभी राहिली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेला स्क्रिन टाइम. लॅपटॉप , कॉम्प्यूटर, स्मार्टफोन, टॅबलेट जास्तीत जास्त वापरल्याने डोळ्यांना मोठा त्रास होतो. मोबाइल आणि लॅपटॉपच्या स्क्रिनचा परिणाम डोळ्यांवर दिसून येत आहे. डोळे कोरडे पडणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांत खाज सुटणे, जळजळ होणे, धूसर दिसणे अशा समस्या निर्माण होत आहेत. डिजिटल आय स्ट्रेनची लक्षणे म्हणून याकडे पाहता येईल. कॉम्प्यूटरचा वापर करणारे 50 टक्के लोक या डिजिटल आय स्ट्रेनने ग्रस्त होऊ शकतात असा निष्कर्ष नुकत्याच केलेल्या एका रिसर्चमधून काढण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची स्क्रिन सतत पाहिल्याने डोळ्यांतील (Digital Screen) पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डोळ्यांत कोरडेपणा जाणवतो. परिणामी खाज, जळजळ आणि डोळ्यांना सूज येऊ शकते. डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागते. डिजिटल स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश (Blue Light) डोळ्यांत जळजळ, खाज आणि सूज आणू शकतो.
नॅशनल आय इन्स्टिट्यूटनुसार (National Eye Institute) डोळ्यांवर जास्त दबाव पडल्यास डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ डिजीटल डिव्हाईसचा वापर केल्यास धुसर दिसू शकते. डिजिटल स्क्रिनमधून निघणारी लाईट तुमच्या झोपेचे चक्र देखील बिघडवू शकते. तुम्हाला जर या सर्वच समस्या टाळायच्या असतील तर काही महत्वाच्या टिप्स नक्कीच फॉलो करू शकता.
20-20-20 नियम अमलात आणाच
लॅपटॉपवर काम करताना किंवा मोबाइल स्क्रिनचा वापर करत असताना प्रत्येक 20 मीनिटांनी स्क्रिन बाजूला करा. नंतर तुमच्यापासून 20 फूट दूर असणाऱ्या एखाद्या वस्तूकडे 20 सेकंदांपर्यंत पाहत राहा. यामुळे डोळ्यांतील मांसपेशींना आराम मिळतो. तसेच डोळ्यांचा थकवा देखील कमी होतो.
काय, तुम्ही अजूनही नवीन पॅनकार्ड घेतलं नाही का? टेन्शन घेऊ नका, ‘या’ पद्धतीने करा अर्ज
स्क्रिन व्यवस्थित करा
स्क्रिन तुमच्या डोळ्यांसमोरच ठेवा. जेणेकरून जास्त झुकावे किंवा मान वळवून पहावे लागणार नाही. स्क्रिनला तुमच्या डोळ्यांपासून 20 ते 30 इंच दूर आणि थोडी खाली राहील अशा पद्धतीने ठेवा.
ब्लू लाइट फिल्टरचा उपयोग करा
Havard Health मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार बहुतांश डिजीटल उपकरणांत ब्लू लाइट फिल्टरचा पर्याय असतो. त्यामुळे तुम्ही एक ब्लू लाइट फिल्टरचा उपयोग करू शकता. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचा थकवा कमी होईल.
डोळ्यांना हायड्रेट ठेवा
जास्त वेळ स्क्रिनवर काम केल्याने डोळ्यांत कोरडेपणा जाणवू शकतो. अशा वेळी तुम्ही आर्टिफिशीयल टीयर ड्रॉप्सचा वापर करू शकता. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा निश्चितच कमी होईल.
डोळ्यांचा व्यायाम करा
डोळ्यांना आराम देण्यासाठी डोळ्यांचा व्यायाम करता येईल. डोळ्यांना गोल गोल फिरवणे किंवा दूर अंतरावरील वस्तूंकडे काही वेळ पाहणे या दोन गोष्टी तुम्ही सहज करू शकता.
अर्रर्र! अॅपलने खोटं बोलून आयफोन 16 फोन विकले, फसवणुकीचा गुन्हा दाखल