10 वी पास उमदेवारांसाठी पोस्ट खात्यात नोकरीची संधी, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

  • Written By: Published:
10 वी पास उमदेवारांसाठी पोस्ट खात्यात नोकरीची संधी, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

India Post Bharti 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job)शोधात आहेत. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने (Indian Department of Posts) नुकतीच एक बंपर भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत पोस्ट खात्यात 78 पदे भरली जाणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिध्द झाले असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Sharad Pawar : ‘मी लढणार नाही, भावनिक आवाहनाचा प्रश्नच नाही’; शरद पवारांचं अजितदादांना रोखठोक उत्तर 

या भरतीद्वारे उत्तर प्रदेश टपाल विभागात 78 ड्रायव्हर पदाच्या रिक्त जागा (सामान्य श्रेणी) भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना काही चूक झाल्यास अर्ज रद्द केला जाईल याची नोंद घ्यावी. इच्छुक उमेदवार www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

राम मंदिरानंतर आता लक्ष्य पुण्येश्वराचे मंदिर! सुनील देवधरांचा पुणेकरांसाठी निश्चय 

अर्ज भरण्याची आणि हार्ड कॉपी सबमिट करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 42 दिवस म्हणजे 16 फेब्रुवारी 2024 आहे.

पात्रता :
इंडिया पोस्ट स्टाफ कार ड्रायव्हर भरती 2024 साठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

यासोबतच उमेदवाराकडे हलकी व अवजड वाहने चालविण्याचा परवाना असावा.
तसेच उमेदवाराला किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
उमेदवाराला मोटर यंत्रणेचे सामान्य ज्ञान देखील असले पाहिजे.

वयोमर्यादा
जे उमेदवार या पदांसाठी करणार आहेत, त्या उमदेवारांचे वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सवलत दिली जाईल.

उमेदवारा या भरतीसाठी ऑफलाईनही अर्ज करू शकतात. त्यासाठी तुम्हाला इतर कागदपत्रांसह 100 रुपयांची पोस्टल ऑर्डर ही मॅनेजर (ग्रेड ए), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर – 208001 येथे पाठवाववी लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज