राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू;1 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळात ‘या’ पदासाठी भरती सुरू;1 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

MSPHC Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित (Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Limited Mumbai) हे राज्य शासनाचं वैधानिक मंहामंडळ आहे. या महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाने आता कार्यकारी अभियंता (Executive Engineer) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://msphc.org/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. MSPHC मुंबई भर्ती मंडळाने जुलै 2023 च्या जाहिरातीत विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्त्वाच्या तारखांविषयी तपशीलवार जाणून घेऊ. (Maharashtra State Police Housing and Welfare Corporation recruitment for the post of Executive Engineer last date to apply is 1st August)

पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (Executive Engineer)

शैक्षणिक पात्रता –
कार्यकारी अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
शासकीय/निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांना कार्यकारी अभियंता पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव किंवा उपअभियंता पदाचा 10 वर्षांचा अनुभव असावा.
उमदेवाराला एमएस ऑफीस व इतर अभियांत्रिकी सॉफ्टवेअरच्या कामकाजाचे ज्ञान असावे.
उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.

वयोमर्यादा-
खुला वर्ग – 50 वर्षांपर्यंत.
आरक्षित – 55 वर्षांपर्यंत.

बीआरएसमध्ये कोणती जबाबदारी? माजी आमदार मुरकुटेंनी स्पष्टच सांगितलं… 

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

अर्जाची पद्धत – ऑफलाइन.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लिमिटेड, भूखंड क्रमांक 89-89A, पोलीस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रवाड, वरळी, मुंबई-400030.

विहीत मुदतीत प्राप्त न झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. तसेच या संदर्भात केल्या जाणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.

अधिकृत वेबसाइट –
https://www.msphc.org/
अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑगस्ट २०२३.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/12zxtM_Dp1NWejtU_Qm4D-3SxRIgel-Kk/view

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube