मुंबई कस्टम्स विभागार कर सहाय्यक, कॉन्सटेबल पदांची भरती सुरू, महिन्याला 81 हजार रुपये पगार

  • Written By: Published:
मुंबई कस्टम्स विभागार कर सहाय्यक, कॉन्सटेबल पदांची भरती सुरू, महिन्याला 81 हजार रुपये पगार

Mumbai Customs Bharti 2023: आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणं फारच कठीण झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतेच, असं नाही. त्यामुळंच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, जर तुम्ही दहावी पास किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.मुंबई कस्टम्स (Mumbai Customs) अंतर्गत कर सहाय्यक (Tax Assistant), कॉन्स्टेबल आणि कॅन्टीन अटेंडंट पदांच्या 32 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

‘आरक्षणाचा GR घेऊन या, भेटच काय गळ्यातच पडतो’; फडणवीसांबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. तर मुंबई कस्टम्स भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – टॅक्स असिस्टंट, कॉन्स्टेबल, कॅन्टीन अटेंडंट

एकूण पदांची संख्या- 32

शैक्षणिक पात्रता –
कर सहाय्यक:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
संगणक अॅप्लिकेशन वापरण्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
डेटा एंट्रीच्या कामासाठी किमान टायपिंग स्पीड 8000 की प्रति तास आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल/कॅन्टीन अटेंडंट:
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा समतुल्य.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा –
कर सहाय्यक, कॉन्स्टेबल – 18 ते 27 वर्षे,
कॅन्टीन अटेंडंट – 18 ते 25 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता –
सहाय्यक/ सीमाशुल्क उपायुक्त, कार्मिक आणि आस्थापना विभाग, 8वा मजला, न्यू कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई 400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://www.mumbaicustomszone1.gov.in/

पगार –
कर सहाय्यक- रु. 25 हजार 500 ते रु. 81 हजार 100.
कॉन्स्टेबल- 18 हजार ते 56 हजार 900 रुपये.
कँटीन- 18 हजार ते 56 हजार 900 रुपये.

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/19ky_-G3v8bwz51ZxBm8wGDiY_7jn0XDP/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube