फक्त 20 रुपयांत मिळतोय 2 लाख रुपयांचा विमा; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

फक्त 20 रुपयांत मिळतोय 2 लाख रुपयांचा विमा; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : मानवी जीवन अनिश्चिततेने भरलेले असते. कधी काय होईल याचा काहीच अंदाज नसतो आणि हा अंदाज कुणालाही बांधता येत नाही. अशा परिस्थितीत सुरक्षित भविष्यासाठी काही पावले उचलण्याची गरज असते. याच कारणांमुळे लोक जीवन विम्याचा (Life Insurance) पर्याय निवडतात. यामुळे एखादी अप्रिय घटना घडली तर कुटुंबाची परवड होत नाही. याच गोष्टींचा विचार करून भारत सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) योजना सुरू केली आहे. ही योजना (Government Scheme) अतिशय फायद्याची आहे. या योजनेची सविस्तर माहिती घेऊ या..

काय आहे विमा योजना

केंद्र सरकारने सन २०१५ मध्ये ही (PMBSY) योजना सुरू केली होती. सर्व भारतीय नागरिकांना स्वस्त दरात जीवन विमा उपलब्ध करून देणे हे उद्देश यामागे होता. या योजनेंतर्गत फक्त २० रुपये प्रीमियम (Insurance Premium) देऊन २ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. एखाद्या दुर्घटनेत मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ही योजना मदतीची ठरते.

Government Schemes : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येणार?

विमा योजनेची मुख्य उद्दिष्टे

या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ७० वर्षां दरम्यान असावे. या योजनेत युवा आणि वृद्ध दोन्ही लाभार्थ्यांना सारखीच मदत मिळते. जर काही दुर्घटनेमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये दिले जातात. या शिवाय जर व्यक्तीला अपंगत्व आले तर त्या व्यक्तीला १ लाख रुपये दिले जातात. या योजनेत विमाधारकाला फक्त २० रुपये वार्षिक विमा हप्ता भरावा लागतो. ही योजना अतिशय स्वस्त आहे त्यामुळे अगदी गरिबतील गरीब व्यक्ती देखील या योजनेत सहभागी होऊ शकतो.

अर्ज कसा कराल

केंद्र सरकारच्या या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी तुमचे ज्या बँकेत बचत खाते आहे त्या बँकेत जावे लागेल.

कर्करोगावरील औषध स्वस्त होणार, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

बँकेत जाऊन तुम्ही संबंधित योजनेचा अर्ज मागणी करू शकता. यानंतर अर्जात विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर हा अर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांकडे जमा करा. या बरोबरच तुम्हाला वार्षिक प्रिमियमचे २० रुपये द्यावे लागतील.

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर प्रधानमंत्री विमा योजनेची अधिकृत वेबसाईटला (https://www.jansuraksha.gov.in) भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. या अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. तुम्हाला तुमचे ओळखपत्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वार्षिक २० रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई मेल किंवा मेसेज प्राप्त होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube