Navratri 2023 : …म्हणून वणीच्या सप्तश्रृंगीला अर्ध शक्तीपीठ मानलं जातं
Navratri 2023 : नवरात्रौत्सवानिमित्त (Navratri 2023) आपण देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेतली. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी तसेच माहुरची रेणुका या देवीच्या पुर्ण पीठांची माहिती घेतली. त्यानंतर आज देवीच्या साडेतीन पैकी अर्ध्या पीठाची महती जाणून घेणर आहोत. कोणतं आहे हे शक्तीपीठ त्याला अर्धपीठ का मानलं जात? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
…म्हणून या भागाला सप्तश्रृंगगड म्हटलं जातं
नाशिक जिल्ह्यातील वणी या ठिकाणी सप्तशृंगगडावर देवीच्या या अर्ध्यापीठाचा मान असेलल्या देवी सप्तश्रृंगीचं मंदीर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश असल्याने या भागाला सप्तश्रृंगगड म्हटलं जातं. हा गड म्हणजे एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, निसर्गाच्या या विलोभनीय दृष्यामध्ये गडावर उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, अशीच भासते.
…म्हणून सप्तश्रृंगीला अर्ध शक्तीपीठ मानलं जातं
देवी सप्तश्रृंगीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती. हीच शस्त्रे तिच्या हातात असंल्याचं सांगण्यात येत. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते. सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा आदी महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.
India vs Bangladesh : पुण्यात इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचं टीम इंडियासमोर आव्हान
तसेच या देवीला साडेतीन शक्तीपीठांतील अर्ध पीठ मानलं जात कारण देवीचे शक्तीपीठ हे ॐ काराचं सगुण रूप मानतात त्यात ‘अ’कार पीठ म्हणून माहूर ओळखले जाते. ‘उ’कार पीठ तुळजापूर, ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्ध्वमात्रा म्हणजेच सप्तश्रृंगी आहे. ऊर्ध्वमात्रा ही पुर्ण व्यंजन नाही म्हणून सप्तश्रृंगीला साडेतीन शक्तीपीठांतील अर्ध पीठ मानलं जात.
“मग सुप्रियाताईंना हमासकडून लढण्यासाठी का पाठवत नाही?” : भाजप नेत्याचा पवारांना खोचक सवाल
तर या देवीच्या अख्यायिका सांगितली जाते की, महिषासूर राक्षसाला मारण्यासाठी देवांनी तिची प्रार्थना केल्यावर ही देवी होमातून प्रकट झाली. तसेच या तिच्या मुर्तीबद्दल ही एक दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली.