पनवेल महापालिकेत स्टाफ नर्स, परिचारिका पदांची भरती, महिन्याला 20,000 रुपये पगार

  • Written By: Published:
पनवेल महापालिकेत स्टाफ नर्स, परिचारिका पदांची भरती, महिन्याला 20,000 रुपये पगार

Panvel Municipal Corporation Recruitment 2023: जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी पनवेल महापालिकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टाफ नर्स (महिला, पुरुष), आरोग्य परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि LHV पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पालिकेने नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पनवेल महानगरपालिका भरती 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

समर्थ रामदास नसते, तर शिवराय झाले नसते; मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वादग्रस्त विधान 

पदाचे नाव – स्टाफ नर्स (महिला, पुरुष), आरोग्य परिचर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि LHV.

शैक्षणिक पात्रता –
स्टाफ नर्स: B.Sc (नर्सिंग)/GNM + MNC नोंदणी.
आरोग्य परिचारिका: ANM + MNC नोंदणी.
LHV: B.Sc (नर्सिंग)/GNM + MNC नोंदणी.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ:  12 वी पास + डिप्लोमा + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणी.
याशिवाय, एमएससीआयटी प्रमाणपत्र आवश्कक

वयोमर्यादा – 21 ते 65 वर्षे.

आवश्यक कागदपत्रे
शालांत परीक्षा प्रमाणपत्र,  नावात बदल असेल तर गॅजेट, डोमेसाईल, लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो, वयाचा पुरावा, शैक्षणिक कागदपत्र, आधारकार्ड, अनुभव प्रमाणपत्र, महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल रजिस्ट्रेशन, गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, एमएससीआयटी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयअर प्रमाणपत्र

अधिकृत बेवसाईट – https://www.panvelcorporation.com/

अर्ज फी –
खुली श्रेणी – रु. 150.
मागासवर्गीय – 100 रु.

नोकरीचे ठिकाण – पनवेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2023

पगार-
स्टाफ नर्स (स्त्री, पुरूष) – 20000 रुपये
आरोग्य सेविका – 18,000 रुपये
LHV –  20000 रुपये
प्रयोगशाळा तंत्रज्ञ –  20000 रुपये

अर्ज करण्याचा पत्ता –
पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग, देवळे तलावासमोर, गोखले हॉलच्या पुढे, पनवेल – 410206

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/12h-Jadt9ql22FBfRL2D250boSavPvypy/view

महत्वाच्या सुचना-
उमेदवाराने स्वत:चे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणे अचूकपणे नोंदवावे.
जन्मातारीख अचूक नोंदवावे.
लिंग, वैवाहिक दर्जा याबाबतती माहिती नमूद करावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube