World Brain Day 2023 : ‘वर्ल्ड ब्रेन डे’ का साजरा केला जातो? या वर्षाची थीम काय जाणून घ्या…
World Brain Day 2023 : दरवर्षी 22 जुलै या दिवसी ‘वर्ल्ड ब्रेन डे’ साजारा केला जातो. हा दिवस सादरा करण्याचं कारण म्हणजे जगभरातील लोकांना मेंदूसंबंधी आजारांविषयी आणि त्यांच्या सध्याच्या परिस्थिती विषयी जागरूक करण्यात यावं. तसेच एखाद्या निरोगी मानसाचा मेंदू देखील निरोगी असणे किती गरजेचे आहे. हे या दिवशी विविध माध्यामातून जगभरातील लोकांनी सांगितलं जात. ( Reason Behind Celebrating World Brain Day what is this years theme )
Ajit Pawar : अर्थमंत्री अजितदादांचं शिक्षण किती? म्हणाले, मी तर दहावीत…
वर्ल्ड ब्रेन डे सुरूवात…
वर्ल्ड ब्रेन डेची सुरूवात 2014 ला झाली वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरॉलॉजीकडून हा दिवस साजरा करण्यास सुरू करण्यात आले. ही संस्था 145 अधिक राष्ट्रीय न्युरॉलॉजीकल संघटना किंवा संस्थांचं प्रतिनिधित्व करते. त्यांच्याकडून दरवर्षी वर्ल्ड ब्रेन डे साजरा करण्यासाठी एक वेगळी थीम निश्चित केली जाते. ज्यामध्ये स्ट्रोक, मानसिक आरोग्य, वाढत वय आणि अपस्मार यांसरख्या थीमचा समावेश आहे.
‘अहो मिटकरी जरा दमानं’; अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या ट्विटवरुन शिवसेना आक्रमक
यावर्षी या वर्ल्ड ब्रेन डेची थीम मेंदूचे ‘आरोग्य आणि अपंगता : कुणाही मागे राहू नये’ ही आहे. यामध्ये न्युरॉलॉजीकल आजारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चांगलं शिक्षण, संशोधन आणि आरोग्याची काळजी या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या दिवसाचं आणखी एक महत्त्व आहे ते म्हणजे यामध्ये मेंदूच्या आजारांवर बोलले जातं किंवा निदान होतं. ज्याचं कधी निदान होत नाही किंवा त्यावर उपचार केले जात नाहीत.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जगभरात या दिवसानिमित्त विविद व्याख्यान, सेमिनार आणि कार्यशाला आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी न्युरॉलॉजीकल टेस्ट देखील मोफत केल्या जात आहेत. तर या दिवसानिमित्त या संस्थेने एक वेबसाईट आणि सोशल अभियान केलं आहे. यावर विविध न्युरॉलॉजीकल आजारांची माहिती देण्यात आली आहे.