‘अहो मिटकरी जरा दमानं’; अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या ट्विटवरुन शिवसेना आक्रमक

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 22T135303.503

Shivsena vs NCP :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर  राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्री घेत उपमुख्यमंत्रिही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.

अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना खास ट्विट केले आहे. मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच #अजितपर्व’ असे कॅप्शन दिले आहे. यावरुन शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विट करत अमोल मिटकरींना दमानं घेण्याचा सल्ला दिला आहे.

‘मी आधीच सांगितलं होतं की, अजितदादा लवकरच’.. राऊतांनी शिंदे गटाला दिला खोचक सल्ला

नरेश म्हस्के म्हणाले की, “अहो, मिटकरी दमानं, सरकार काम करतंय जोमानं, बंद करा मिटकरी, मिठाचा खडा की टाकनं.  सरकार करतंय काम भारी, ट्रिपलइंजिनची शक्ती न्यारी, विकासकामांना गती खरी, तुम्ही बंद करा टांग आडवनं, मिटकरी दमानं.” अशी कविता सादर करत नरेश म्हस्केंनी मिटकरींना सुनावले आहे. 

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

दरम्यान अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना जोर आला आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिल्याचे सांगितले आहे. तसेच पाच जुलैच्या अजित पवारांच्या मेळाव्यात माझी गाडी उपमुख्यमंत्री पदावरच अडकली असून पुढे जायला तयारच नाही, असे म्हणत मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले होते. परंतु यामुळे आता  शिंदे गट नाराज झाल्याचे दिसून येत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube