स्टेट बॅंकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, वर्षाला मिळणार 46 लाख रुपये वेतन

स्टेट बॅंकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, वर्षाला मिळणार 46 लाख रुपये वेतन

State Bank of India Bharati 2024 : तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरी (Job) करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्याठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीअंतर्गत सीनियर वाईस प्रेसिडेंट (Senior Vice President) , असिस्टंट वाईस प्रेसिडेंट, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ही पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज कसा करावा? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? याच विषयी जाणून घेऊ.

भारीच ना …, फक्त 95 हजारात खरेदी करता येणार देशातील पहिली CNG Bike, जाणून घ्या फीचर्स 

एकूण 16 जागांसाठी ही भरती आहे. या जागांपैकी 5 जागांसाठीची भरती ही कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून केली जाईल, तर 11 जागांची भरती रेग्युलर पध्दतीने केली जाईल. उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो, एकाच उमेदवाराला अनेक पदांसाठी अर्ज करता येणार नाही.

उमेदवार अधिकृत वेबसाइट bank.sbi/web/careers वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 3 जुलैपासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2024 आहे. यानंतर बँकेची अर्ज विंडो बंद होईल.

शैक्षणिक पात्रता –

या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमधील B.E./B.Tech ची पदवी असणे आवश्यक आहे.

अनुभव
सीनियर वाईस प्रेसिडेंट – 10 वर्षे
असिस्टंट वाईस प्रेसिडेंट – 7 वर्षे
व्यवस्थापक – 5 वर्षे
उपव्यवस्थापक – 3 वर्षे

Anupama : अनुपमा आणि अनुजच्या आयुष्यात नवीन वळण, ‘अनुपमा’चा नवीन रोमांचक प्रोमो रिलीज

वयोमर्यादा
सीनियर वाईस प्रेसिडेंट – 38 ते 50 वर्षे
असिस्टंट वाईस प्रेसिडेंट– 33 ते 45 वर्षे
व्यवस्थापक- 28 ते 40 वर्षे
उपव्यवस्थापक – 25 ते 35 वर्षे

पगार

सीनियर वाईस प्रेसिडेंट– 46 लाख (वार्षिक पगार)

असिस्टंट वाईस प्रेसिडेंट – 40 लाख रुपये (वार्षिक वेतन)

अर्ज फी

अर्ज करताना, उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.

SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
यानंतर, होमपेजवर जा आणि करिअर या पर्यायामधील ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ॲप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर नोंदणी करून संपूर्ण अर्ज भरा.
अर्ज भरतांना सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्जाची फी भरून अर्जाची अंतिम प्रिंट काढा.

इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केल्यानंतर, पात्रतेच्या निकषांमध्ये तंतोतंत बसणारे उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज