भारतीय रेल्वेत 700 हून पदांसाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारही करू शकतात अर्ज

भारतीय रेल्वेत 700 हून पदांसाठी भरती सुरू, दहावी पास उमेदवारही करू शकतात अर्ज

Indian Railway Bharti 2024 : अनेकांना रेल्वेत (Indian Railway) नोकरी करायची इच्छा असते. तुम्हालाही रेल्वे नोकरी (Railway Job) करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकतीच भारतीय रेल्वेने विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू आहे. रेल्वे सातेशहून अधिक शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? अर्ज करण्याची अंतिम तारीख काय? याच विषयी जाणून घेऊ.

‘बागी 2’ सिनेमाला 6 वर्षे पूर्ण, अभिनेता टायगर श्रॉफने शेअर केला सिनेमातील तो खास फोटो 

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन (SECR) च्या बिलासपूर विभागाने 700 हून अधिक शिकाऊ पदांची भरती जाहीर केली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बिलासपूर विभागात प्रशिक्षणार्थींची भरती केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे.

रिक्त जागांचा तपशील –
ट्रेड नाव व्हेकन्सी कारपेंटर – 38, कोपा- 100, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 10, इलेक्ट्रीशियन 137, इलेक्ट्रीशियन (मेकॅनिकल) 05, फिटर 187, मशिनिस्ट 04, पेंटर 42, प्लंबर 25, मेकॅनिक (रेफ्रिजरेटर) 15, एसएमडब्ल्यू 04, इंग्रजी स्टेनो – 27, स्टेनो हिंदी 19, डिजल मेकॅनिक 12, टर्नर 04, वेल्डर 18, वायरमन 80, केमिकल लॅब असिस्टंट 04, डिजिटल फोटोग्राफर 02.

Lok Sabha Elections : तुतारी हाती घेताच निलेश लंकेचा हल्लाबोल, पण विखेंचे नो कमेंट्स 

पात्रता काय?
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवार हा 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –
अर्जदाराचे वय किमान १५ वर्षे आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
SC/ST उमेदवारांना 5 वर्षांपर्यंत सूट मिळू शकते.
OBC उमेदवारांना 3 वर्षांपर्यंत आणि माजी सैनिक आणि अपंग व्यक्तींना 10 वर्षांपर्यंत सूट मिळू शकते.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2024 आहे.

अर्ज कसा करायचा?
पायरी 1: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
पायरी 2: मुख्यपृष्ठावरील “भरती” किंवा “करिअर” विभागात जा.
पायरी 3: अप्रेंटिससाठी SECR भर्ती 2024 वर अधिसूचना पहा आणि त्यावर क्लिक करा.
पायरी 4: सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता आणि निकष समजून घ्या.

पायरी 5: पुढे जाण्यासाठी, “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.
पायरी 6: वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव यासारखे सर्व आवश्यक तपशील भरा.
पायरी 7: अर्जात नमूद केलेले अनिवार्य स्कॅन केलेले दस्तऐवज अपलोड करा.
पायरी 8: प्रविष्ट केलेली माहिती एकदा तपासून घ्या, मगच फॉर्म सबमिट करा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube